Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • कच्चं तेल 6 टक्के कोसळलं, तरीही पेट्रोल-डीझेल 3 रुपयांनी का महागलं?
Top News

कच्चं तेल 6 टक्के कोसळलं, तरीही पेट्रोल-डीझेल 3 रुपयांनी का महागलं?

Petrol Diesel Price Hike

Petrol Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेलं 6 रुपयांनी (Crude oil cheaper by ₹6) कोसळलय. मग आपल्याला वाटलं कि पेट्रोल डिझेलच्या किंमती पण कमी होतील, पण पेट्रोलियम मंत्र्यांचा अजबच दावा पुढे आलाय, कच्च तेलं 6 टक्क्यांनी कोसळलं पण इकडे पेट्रोल डीझेल ३ रुपयांनी महाग केलं. देशात पेट्रोल डीझेलच्या किंमतीत सलग चौथ्या वेळा वाढ झालीये. भारतामध्ये १८ दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याचा अहवाल द इकॉनॉमिक टाइम्सने (The Economic Times) ने १५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केला आहे.

देशभरात आज सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात २.६१ रुपयांनी तर डिझेलच्या दरात २.७१ रुपयांनी मोठी वाढ (Hike in Petrol and Diesel Prices) झाली आहे. गेल्या १० दिवसांमधील ही सलग चौथी दरवाढ असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा कात्री बसली आहे. येत्या काही दिवसांतचं पेट्रोल आणि डीझेलचा २०० च्या पुढे जाणार आल्याची दाट शक्यता आहे. देशात किती साठा शिल्लक आहे, किती दिवस पुरेल आणि, पेट्रोल डीझेल बंद होणार का? या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

हेही वाचा – तेल बाजारातून दिलासादायक बातमी; कच्च्या तेलाचे भाव घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

केवळ ८ दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध

त्यानुसार आता पाहिलं तर १० दिवस गेले आहेत आणि ८ दिवस राहिले आहेत, त्यामुळे भारताकडे केवळ ८ दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे., असं म्हणता येईल. ज्याप्रमाणे पेट्रोल डीझेलच्या किंमतींचा आलेख जोराने आणि सातत्याने वर सरकतोय, त्यावरून पेट्रोल डीझेलचे भाव येत्या काळात २०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर त्याही नंतर ते बंदही होण्याची दाट शक्यता आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा ४५ दिवसांचा स्टॉक उपलब्ध

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताकडे जमिनीखाली उभारलेल्या विशेष साठवणुकीत साधारण ९ दिवस पुरेल इतके अतिरिक्त कच्चे तेल आणीबाणीच्या काळासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर देशात ६० दिवस पुरेल इतका कच्चे तेल, नॅचरल गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा एकत्रित साठा रिफायनरी आणि तेल कंपन्यांकडे सुरक्षित आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा ४५ दिवसांचा रोलिंग स्टॉक उपलब्ध आहे.

राज्यातील २,००० पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड

मात्र एकट्या महाराष्ट्रात पहिले तर ५ हजारांच्या पेक्षा जास्त पेट्रोल पंपांवर विशेषता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डीझेल पूर्णपणे शिल्लक नाहीये. मे २०२६ च्या दोन आठवड्यात पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या पुरवठ्यातील विलंबाने आणि अफवांमुळे राज्यातील सुमारे २,००० पेट्रोल पंप तात्पुरते बंद झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या आणि डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण ७,५०० पंपांपैकी सुमारे २,००० पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागल्याने ते काही काळासाठी बंद ठेवावे लागेले होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts