• Home
  • लाईफस्टाईल
  • 2026 चे स्वागत करण्यासाठी शांत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नक्की भेट द्या या समुद्रकिनाऱ्यांना
लाईफस्टाईल

2026 चे स्वागत करण्यासाठी शांत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नक्की भेट द्या या समुद्रकिनाऱ्यांना

Peaceful and scenic beach destination ideal for welcoming the New Year 2026

best beaches to welcome 2026 : 2025 हे वर्ष संपायला आता 15 ते 16 दिवस बाकी आहे. हे वर्ष आणि या वर्षातील सण उत्सव किती लवकर सरले नाही का? आपण काही दिवसांनी 2025 या सरत्या वर्षाला निरोप देऊन 2026 ला वेलकम करणार आहे. 2026 या वर्षाच्या स्वागताची तयारी, सेलिब्रेशनची तयारी आता तरुण तरुणाईमध्ये सुरूच झाली असेल. अनेक जण समुद्रकिनारी जाऊन या वर्षाचे स्वागत करणार असतील. तुम्हीही असेच समुद्रकिनारे शोधात आहेत का ? जिथे तुम्ही सुंदर असे सेलिब्रेशन करू शकतात. जाणून घ्या हे समुद्रकिनारे.

1 बागा बीच (गोवा)

उत्तर गोव्यातील बाग बीच हे पार्टी कॅपिटल आहे. याठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण सेलिब्रेशन साठी बागा बीचवर येतात. हे गोव्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. या बीच ची खास स्पेशालिटी म्हणजे सोनेरी वाळू आहे. तेथील नारळाची झाडे, वॉटर स्पोर्ट, नाईटलाईफ यासाठी हे ठिकाण फेमस आहे. याठिकाणी अनेक बीच शॅक्स आणि रेस्ट्रॉरंट आहे. तुम्ही 2026 च्या वेलकम पार्टीसाठी जाणार असाल तर समुद्रकिनारी असलेल्या टिटोज, कॅफे मॅम्बो सारख्या जगप्रसिद्ध नाईट क्लब्समध्ये सहभागी होऊ शकतात.

2 अंजुना बीच (गोवा)

अंजुना बीच हे गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे बीच नैसर्गिक सौन्दर्यासाठी आणि सुंदर सूर्यास्तासाठी ओळखले जाते. याठिकाणी पर्यटक समुद्र, सूर्य वाळूचा आनंद घेण्यासाठी जातात. हे गोव्यातील ट्रान्स म्युझिक आणि बोहेमियन संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे जाऊन फुल धम्माल करू शकतात.

हे ही वाचा : Bad Habits Affect Health : या चुकीच्या सवयीमुळे होतात आरोग्यावर वाईट परिणाम

3 वर्कला बीच (केरळ)

केरळ मधील वर्कला बीच हे अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसलेले उंच कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील कडे लाल रंगाचे दिसून येतात. अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी हे बीच प्रसिद्ध आहे. येथील कड्यांवर असलेल्या रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास मेनू, लाईव्ह म्युझिक आणि उत्कृष्ट दृश्यांसह शांत पार्टीचे आयोजन केले जाते.

4 राधानगर बीच, अंदमान आणि निकोबार

राधानगर बीच हे अंदमान निकोबार बेटांवर असलेल्या स्वराज द्वीप म्हणजे हॅवलॉक बेटावर वसलेले आहे. हा एक शांत आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे. हा नैसर्गिक सौंदर्याने आणि निळ्याशार पाण्याने मोहून घेतो. या बीच ला ब्लु फ्लॅग विच प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. याठिकाणी गोव्यासारख्या व्यावसायिक पार्ट्या होत नाहीत, परंतु नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

5 मोरजिम बीच, गोवा

गोव्यातील मोरजिम बीच हे लक्झरी पार्टीसाठी ओळखले जाते. एवढेच नाही तर हा समुद्रकिनारा रिडले कासवांच्या घरट्यांची देखील प्रसिद्ध आहे. हा गोव्यातील शांत स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे. हा त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखला जातो. एवढेच नाही तर याला लिटल रशिया देखील म्हंटले जाते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे पार्ट्यांचे आयोजन देखील करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts