DIY Skincare Hacks: आजकाल अनेक जण त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय करतात. मात्र हे सर्व उपाय नेहमीच फायदेशीर ठरतात असे नाही. जर तुम्हीही चेहरा उजळ आणि तेजस्वी करण्यासाठी घरगुती पदार्थ वापरत असाल, तर थांबा. हे उपाय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. कसे ते जाणून घ्या.
आजच्या धावपळीच्या जीवनात सुंदर आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा आधार घेतात. सोशल मीडियावर दिसणाऱ्या विविध DIY ब्यूटी टिप्समुळे टॅनिंग कमी करण्यासाठी किचनमधील पदार्थांचा सर्रास वापर केला जातो. मात्र प्रत्येक नैसर्गिक उपाय त्वचेसाठी सुरक्षित असेलच असे नाही. काही घरगुती घटक योग्य पद्धतीने न वापरल्यास त्वचेला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानही पोहोचवू शकतात. त्यामुळे अशा उपायांचा वापर करण्यापूर्वी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा: लवकरच मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार; सातारा गॅझेट GR विलंबावर जरांगेंचा संताप
बटाटा
बटाट्याचा वापर डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी केला जातो, पण याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. काहीवेळा त्वचेवर घासल्याने रॅशेस किंवा इरिटेशन होऊ शकते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे तो स्किनसाठी चांगला मानला जातो. पण थेट रस लावल्यास त्यातील आम्लीय गुणधर्मांमुळे त्वचेची जळजळ किंवा संवेदनशीलता वाढू शकते.
लिंबू आणि काकडी
काकडी त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन देते, पण लिंबूसोबत वापरल्यास त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील होऊ शकते, ज्यामुळे डाग किंवा जळजळ होण्याचा धोका वाढतो.
कांद्याचा रस
कांद्यात सल्फर कंपाऊंड असतात, जे केसांसाठी फायदेशीर मानले जातात. मात्र चेहऱ्यावर लावल्यास जळजळ, खाज आणि अॅलर्जिक प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते.
लसूण
लसूणमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असले तरी तो थेट त्वचेवर लावल्यास रासायनिक प्रतिक्रिया, लालसरपणा किंवा पीलिंग होऊ शकते. त्यामुळे DIY उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.






