Breaking News :
Top News

वास्तुदोषामुळे जाणवतेय आर्थिक समस्या; करा या मंत्रांचा जप

Peaceful home with spiritual symbols representing vastu dosh remedies and mantra chanting

Vastu dosh remedies mantras : भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला खास महत्व आहे. जर तुमच्या घरात सतत तणाव, आजारपण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, कामात अडथळे येणे यासारख्या समस्या उद्भवत असतील तर अनेक जण याला वास्तुदोषाची कारणे म्हणतात. म्हणजे तुम्ही राहत असलेल्या घरात वास्तुदोष असल्याचे मानले जाते. त्यामुळेच आपण जेव्हा कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वास्तूशांती केली जाते. किंवा वास्तूदोष दूर करण्यासाठी काही उपाय केले जातात. तुम्ही देखील वास्तुदोषमुळे परेशान असाल तर या मंत्राचा जप करून घरातील नाकारतांक ऊर्जा आणि वास्तुदोषाचा नायनाट करू शकता. जाणून घ्या कोणता आहे हा मंत्र आणि उपाय.

ओम गण गणपतये नमः

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आपण असे काही मंत्रांचा जप करू शकतो ज्यामुळे घरात सुखशांती लाभेल. आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होईल. आपण गणेश पूजनादरम्यान वापरतो तो मंत्र आपण काही अडचणींच्या काळात देखील वापरू शकतो. हा मंत्र म्हणजेच ओम गण गणपतये नमः . या मंत्राचा नियमित जप केल्यास घरातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते. एवढेच नाही तर नवीन कामांमध्ये यश मिळवण्यासाठी देखील तुम्हीओम गण गणपतयेया मंत्राचा जप करू शकता.

ओम हं हनुमंते नम:

वस्तूसंबंधित असलेले दोष तुमच्या कामात अडथळा आणत असल्याचे तुम्हाला वाटत असले तर तुम्ही ओम हं हनुमते नमः हा मंत्र उच्चारू शकतात. या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. या मंत्राच्या जपामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि येणाऱ्या अडथळ्यांवर आपण मात करू शकतो. या मंत्रात एवढी ताकत आहे कि, वास्तुदोषामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात.

ओम भूर्भुवः स्व: तत्सावितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्

तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी वास्तुदोष असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर ओम भूर्भुवः स्व: तत्सावितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्” या मंत्राचा जप करू शकतात. या मंत्रात एवढी ताकत आहे कि, अध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मकता निर्माण होते. या मंत्रामुळे घरात शांती, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

कितीवेळा करावा जप

कोणत्याही मंत्राचा जप करत असताना काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. त्यानुसार खास करून मंत्रांचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करणे फायदेशीर ठरते. तर 108 वेळा मंत्राचा जप केला पाहिजे असे वास्तुशास्त्रात म्हंटले जाते.

वास्तुदोष म्हणजे काय

वास्तुशास्त्रनुसार घराची दिशा, रचना, खोल्यांची मांडणी, दरवाजेखिडकी, स्वयंपाकघर, देवघर या सर्वांची योग्य जागेनुसार केलेली मांडणी आणि या मांडणीत एखादी चूक झाली तर त्याला वास्तुदोष म्हंटले जाते. यामुळे मानसिक अस्वस्थता, आरोग्य समस्या, पैशांची कणकण, नात्यांतील कटुता अशा समस्या उद्भवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts