MSRTC Online Pass: एसटी प्रवाशांसाठी एक महत्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ‘ आवडेल तेथे प्रवास’ या योजनेचा ४ आणि ७ दिवसांचा पास आता ऑनलाइन काढता येणार आहे. त्यामुळे बस्थानकावर रांगेत उभे राहण्याची गरज नसून, घरबसल्या पासचे बुकिंग करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधेचा (MSRTC Bus Pass) विस्तार केला आहे. ‘ आवडले तेथे प्रवास’ (Aavadel Tithe Pravas Pass) या लोकप्रिय योजनेतील ४ दिवस आणि ७ दिवसांचे पास आता ऑनलाइन पद्धतीने (MSRTC Online Booking) घेता येणार आहेत. त्यामुळे पास काढण्यासाठी बसस्थानक किंवा एसटी आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.
प्रवाशांना एसटीच्या अधिकृत वेबसाइट तसेच मोबाईल ॲपच्या (MSRTC App) माध्यमातून घरबसल्या पाससाठी अर्ज करता येणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात, सुट्ट्यांमध्ये किंवा कुटुंबासह प्रवासाचे नियोजन (MSRTC Latest Update) करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते.
हेही वाचा: नवरात्रात उपवास करताय? मग हे पदार्थ नक्की खा; जाणून घ्या चविष्ट आणि पौष्टिक पर्याय
पास काढण्याची प्रक्रिया कशी असेल?
ऑनलाइन पास घेण्यासाठी प्रवाशांना एसटीच्या अधिकृत डिजिटल माध्यमाचा वापर करावा लागेल. आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पासची डिजिटल प्रत उपलब्ध होईल. तसेच प्रवासाच्या वेळी हा पास मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येईल किंवा त्याची प्रिंट सोबत ठेवता येईल. त्यामुळे कागदी पास घेण्यासाठी स्वतंत्रपणे आगारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
QR कोडद्वारे होणार पासची तपासणी
ऑनलाइन पद्धतीने जारी करण्यात आलेल्या पासवर QR कोड असेल. प्रवासादरम्यान एसटीचे अधिकारी किंवा कर्मचारी हा QR कोड स्कॅन करून पासची वैधता तपासतील.
त्यामुळे प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी पासची PDF प्रत मोबाईलमध्ये व्यवस्थित सेव्ह करून ठेवणे आवश्यक आहे. मोबाईलमध्ये पास दाखवणे शक्य नसल्यास त्याची प्रिंटही सोबत ठेवता येईल.
प्रवाशांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचे ४ दिवसांचे आणि ७ दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध आहेत.
अधिकृत एसटी वेबसाइट किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून पास काढता येईल.
ऑनलाइन मिळालेला पास मोबाईलमधील PDF स्वरूपात दाखवता येईल.
इच्छेनुसार पासची प्रिंट काढूनही प्रवास करता येईल.
पासवरील QR कोड स्कॅन करून प्रवासादरम्यान पडताळणी केली जाईल.
ऑनलाइन सुविधेमुळे बसस्थानक किंवा आगारात जाऊन पास घेण्याची आवश्यकता कमी होईल.
सुट्टीच्या काळात प्रवाशांना फायदा
सण, सुट्ट्या आणि पर्यटनाच्या हंगामात एसटीच्या पाससाठी होणारी गर्दी लक्षात घेता ऑनलाइन सुविधा प्रवाशांसाठी सोयीची ठरू शकते. घरबसल्या पास उपलब्ध झाल्याने प्रवासाचे नियोजन आधीच करता येईल आणि वेळेचीही बचत होईल.
एसटीच्या या डिजिटल सुविधेमुळे ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी पास मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.



