• Home
  • महाराष्ट्र
  • मोनोरेलमुळे मुंबईकरांच्या मागे लागली साडेसाती, मोनोरेलचा झाला भीषण अपघात
Mumbai

मोनोरेलमुळे मुंबईकरांच्या मागे लागली साडेसाती, मोनोरेलचा झाला भीषण अपघात

website 5 4

Mumbai monorail accident : पावसाळ्यापासून मुंबईतील मोनोरेल संबंधित तांत्रिक बिघाडाच्या अनेक बातम्या समोर येत आहे. आता आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली असून मुंबईत पुन्हा एकदा मनोरेलचा अपघात झाल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. यामुळे मुंबईकरांना मोनोट्रेनच्या सुविधेसाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

मुंबईतील वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शन जवळ चाचणी सुरू असताना एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झाला. या मनोरेलचा एक डब्बा पटरी वरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याचे पाहायला मिळाले. या मोनोरेल मध्ये सुदैवाने कोणताही प्रवासी प्रवास करत नव्हता यामुळे जीवितहानी होण्यापासून वाचली.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी वडाळा परिसरात आत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना मोनोरेलचा अपघात झाला. या ठिकाणी ट्रायल रन सुरू होती. परंतु मनोरेलचा डब्बा पटरी वरून खाली उतरून एका बाजूला झुकला. आणि ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला. या अपघातामुळे ट्रेनच्या अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे. ही परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ने मोनोरेल मध्ये आत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग प्रणाली लागू करण्यासाठी मोनोरेल काही दिवसांसाठी बंद केले ठेवली होती. त्यानंतर आज या मोनो ट्रेनची चाचणी करण्यात आली. मेधा एसएमएस रेल प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारामार्फत ही नवीन प्रणालीची आणि गाड्यांची चाचणी सुरू होती. परंतु त्याचवेळी हा अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, मनोरेलचे कर्मचारी, एमएमआरडीए अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या घसरलेल्या मोनोरेलच्या डब्याचे आणि ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान आणि गाड्यांच्या चाचणी दरम्यान मोठा बिघाड झाला नसून मोनोरेलच्या नवीन ट्रॅकच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Mumbai monorail accident)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts