Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह 5 जणांवर काळाचा घाला
Top News

पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह 5 जणांवर काळाचा घाला

website 12 1
113

Pune Navale Bridge Accident : काल पुण्यातील नवले पुलावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. या अपघाताने आगीचे रूप धारण केले. यामध्ये 8 जनांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या घटनेमुळे मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,  पुण्यातील नवले ब्रिजवर सेल्फी पॉईंट जवळ एका टुरिस्ट व्यक्तींच्या कारला कंटेनरने धडक दिली. यामुळे कारच्या पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकल्याने कार ने पेट घेतला. यामुळे काही क्षणात कंटेनर आणि कारचा समोरील भाग जाळून खाक झाला. यावेळी कारमध्ये असलेले दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा, कंटेनर चालक आणि क्लीनर यांचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाच ते सात मिनिटांच्या आत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरलेले होते. या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत आणखी माहिती समोर अली असून साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने एक ट्रक जात होती. त्याच रस्त्यावर ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने या ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. त्यानंतर याच ट्रकने एका कारला धडक देऊन ही कार आणि ट्रक रस्त्यावरील आणखी एका ट्रकच्या मध्ये अडकली.आणि याठिकाणी आगीचा भडका उडाला. या संपूर्ण घटनेने नवले ब्रिजवरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला आहे.

मयत व्यक्तींची नावे समोर

या भीषण अपघातात मयत व्यक्तींची नावे देखील समोर आली आहेत. त्यामधेय स्वाती नवलकर, त्यांच्या आई शांता दाभाडे, आणि वडील दत्तात्रय दाभाडे या तिघांचा देखील मृत्यू झाला आहे. हे संपूर्ण नवलकर कुटुंब हे पुण्यातील रहिवासी होते. गुरुवार असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परतत येतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. एवढेच नाही तर कारचालक धनंजय कोळी याचाही मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा – पुण्यात संसार थाटलेल्या बांगलादेशी महिलेला ATS पथकाने पकडले, मायदेशी पाठवण्याची तयारी सुरू

तिघांविरोधात गुन्हा दाखल (Pune Navale Bridge Accident)

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशम दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमीं झालेल्या 15 जणांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मयत झालेल्या आठ जणांवर त्यांच्या मूळगावी किंवा पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातानंतर पुणे येथील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक, मालक आणि क्लीनर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts