• Home
  • राजकारण
  • शिवसेना कोणाची फैसला पुन्हा लांबणीवर; आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
महाराष्ट्र

शिवसेना कोणाची फैसला पुन्हा लांबणीवर; आज सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

इंग्लंडचा बांगलादेशवर धडपडत विजय टीम इंजियाला धक्का 3 1

नवी दिल्ली : जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळं आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी आहे. त्यामुळं या खटल्याबाबत तारीख पे तारीख हा प्रकार पु्न्हा एकदा पाहायला मिळत आहे.

हे हि वाचाठाकरे की शिंदे… शिवसेना कोणाची? आज होणार फैसला, 2022 पासून काय-काय घडलं?

न्यायालयात काय घडलं :

आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल, असं स्पष्ट केलं होतं. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं 12 नोव्हेंबरची तारीख दिली. परिणामी आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तसंच शिंदे गटाकडे सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असल्यानं त्यांना सुनावणीची फारशी घाई नाही. म्हणून शिंदे गटानं याप्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घेतली तरी चालेल असं म्हटलं आहे.

सुनावणीची तारीख लवकर द्यावी :

यावर कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीसाठी आग्रह धरला. यावर न्यायालयानं त्यांना अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारला. त्यावर सिब्बल यांनी मी 45 मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करेल, असं सांगितलं. तसंच येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणं आवश्यक असल्यानं लवकरची तारीख द्यावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली. तेव्हा न्यायालयानं ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल, असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts