Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • ही अभिनेत्री 5 वर्षांनी टीव्हीवर परततेय; नवा चेहरा डेब्यूत, प्रोमो पाहिलात का तुम्ही?
मनोरंजन

ही अभिनेत्री 5 वर्षांनी टीव्हीवर परततेय; नवा चेहरा डेब्यूत, प्रोमो पाहिलात का तुम्ही?

star pravah

Pathrakhin Marathi Serial: मराठी टेलिव्हिजन विश्वास नवीन मालिकांची रेलचेल सुरू असताना आता स्टार प्रवाहवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेभोवती सध्या जोरदार चर्चा रंगली असून तिचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या नव्या मालिकेचं नाव “पाठराखीण’ असून ती दोन बहिणींच्या नात्यावर आधारित आहे. या कथेत भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींच्या आयुष्यातील संघर्ष त्याग आणि एकमेकांवरील निस्सीम प्रेम दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक संकटात एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या बहिणींची कहाणी प्रेक्षकांसमोर भावनिक प्रवास उलगडणार आहे.

हेही वाचा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस

या मालिकेत प्रमुख भूमिकेत Prajakta Gaikwad दिसणार असून ती तब्बल पाच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री गौरी इंगवले देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून ही तिची टेलिव्हिजन क्षेत्रातील नवी सुरुवात आहे.

या महिलेची निर्मिती बांदेकर कुटुंबीयांच्या ‘सोहम प्रोडक्शन’कडून करण्यात आली आहे. मालिकेत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री मिताली जगताप यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्या प्राजक्ताच्या मामीच्या भूमिकेत दिसणार असून गौरीच्या आईची भूमिका साकारणार आहेत. तसेच रमेश वाणी, दीप्ती लेले आणि शकुंतला नरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र अद्याप तिच्या प्रसारणाची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. ‘पाठराखीण’ ही मालिका 1 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी एका दिग्गज अभिनेत्रीशी झालेल्या चर्चांमुळे प्राजक्ता गायकवाड चर्चेत आली होती, मात्र आता ती पुन्हा दमदार पुनरागमन करत असल्याचं दिसून येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts