Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महाकाव्य चित्रपटाने प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाने दोन आठवड्यांत तब्बल ८४.७० कोटींची निव्वळ कमाई करत शानदार कामगिरी केली आहे. आता चित्रपट तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून, १०० कोटींच्या क्लबपासून काहीच अंतरावर आहे. मात्र, हा टप्पा गाठण्यासाठी पुढील आठवडा निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा: सावधान! ‘या’ 5 घरगुती पदार्थांचा चेहऱ्यावर वापर करू नका; DIY हॅक्स ठरू शकतात धोकादायक
जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमांची मालिका सुरू केली. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेला 11.35 रु. कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. ६१९२ शोजमध्ये ३२.३ % प्रेक्षक उपस्थितीसह हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिकदमदार ओपनिंग देणारा चित्रपट ठरला.
भारतातील बॉक्क्स ऑफिस कलेक्शन
पहिला आठवडा: 57.70 कोटी रु
दुसरा वीकेंड: 17.40 कोटी रु
11वा दिवस (सोमवार): 2.65 कोटी रु
12वा दिवस (मंगळवार): 2.75 कोटी रु
13वा दिवस (बुधवार): 2.10 कोटी रु
14वा दिवस (गुरुवार): 2.10 कोटी रु
एकूण कमाई: 84.70 कोटी रु
चित्रपटाची सातत्यपूर्ण कमाई पाहता, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिग्गज कलाकार आणि तांत्रिक टीम
या चित्रपटाला Ajay-Atul यांच्या भव्य संगीताची साथ लाभली असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार Santosh Sivan यांच्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक दृश्य अधिक भव्य आणि वास्तवदर्शी वाटते.
चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख आणि स्वतः रितेश देशमुख यांचा दमदार सहभाग आहे.












