Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • वाढदिवशीच सलमान खान अडकला नवीन वादात; स्वाक्षरीवर घेतला आक्षेप
मनोरंजन

वाढदिवशीच सलमान खान अडकला नवीन वादात; स्वाक्षरीवर घेतला आक्षेप

Bollywood actor Salman Khan amid controversy after objection raised over his signature

Salman Khan new controversy : बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान चा आज वाढदिवस आहे. त्याचा हा 60 वा वाढदिवस असु सोशल मीडियावर अनेकांनी सलमान खानला शुभेच्छा दिल्या. परंतु ऐन वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

अभिनेता सलमान खानला राजस्थानातील कोटा येथील ग्राहक न्यायालयाने समन्स बजावला आहे. हे पान मसाल्याच्या जाहिरातींवर संबंधित प्रकरण असल्याचे समोर आले असून याप्रकरणी आता न्यायालयाने सलमान खानने सादर केलेल्या पॉवर ऑफ ऍटर्नी (POA) वरील स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तर याप्रकरणी आता 20 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

15 ऑक्टोबर रोजी भाजप नेते तथा वकील इंद्र मोहन सिंग हनी यांनी सलमान खान विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या तक्रारीमध्ये मोहन सिंग यांनी राजश्री पान मसाला आणि सलमान खान यांनी यांच्या उत्पादनाला केशरयुक्त वेलची पान मसाला असे म्हणत ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचे सांगितले होते. केसर हे 4 लाख रुपये किलो असून केशरयुक्त पान मसाला 5 रुपयांना मिळतो. हे कसं काय होऊन शकतं असा आरोप इंद्र मोहन सिंग हनी यांनी सलमान खान यांच्यावर लगावला आहे.

हे ही वाचा : दृश्यम 3 चा टिझर लॉन्च; या खास दिवशी येणार सिनेमागृहात

अशा जाहिराती या ग्राहकांची दिशाभूल करतात. त्यांच्या जाहिराती, खासकरून तरुणांना फसवण्याचा काम करतात. जेणेकरून पान मसाला खाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. परंतु पान मसाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या आणि कर्करोग होण्याचे चान्सेस वाढतात.

याप्रकरणी 9 डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याने पावर ऑफ ऍटर्नीवर (POA) सलमान खानच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. त्यांनी स्वाक्षरीमध्ये कोणती तरी चूक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली असून ही त्याच्या सही पेक्षा जास्त वेगळी सही असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात येत असून न्यायालयाने देखील या स्वाक्षरीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तर सलमान खानला हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts