Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • बॅटल ऑफ गलवान टिझरला ट्रोल करणाऱ्यांना तहेसिन पुनावाला यांनी दिले प्रत्युत्तर
मनोरंजन

बॅटल ऑफ गलवान टिझरला ट्रोल करणाऱ्यांना तहेसिन पुनावाला यांनी दिले प्रत्युत्तर

Tehseen Poonawalla addressing trolls over criticism of Battle of Galwan teaser
96

Tehseen Poonawalla Battle of Galwan : नुकताच सलमान खानचा बॅटल ऑफ गलवा या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. परंतु या चित्रपटाच्या टिझर रिलीज नंतर सोशल मीडियावर सर्वत्र ट्रोल करण्यात आले. कारण टिझर मध्ये दाखवलेल्या एका दृश्यात सलमान खान च्या चेहऱ्यावर हलकं हसू दिसून आलं. जे की चुकीचे असल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. परंतु आता या ट्रोलिंगला एका राजकीय विश्लेषकाने प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या टिझर मध्ये दाखवलेल्या एका दृश्यात सलमान खान हलकं असं स्मित करत आहे. परंतु त्या दृश्याचा आणि त्या हास्याचा अर्थ ट्रोलर्सला समजलेला नाही. ते हसू निष्काळजी नसून ते संयमी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. धोक्याच्या क्षणात शांत राहणाऱ्या सैनिकाची एक भावना असल्याचे प्रत्युत्तर राजकीय विश्लेषक आणि बिग बॉसचे माजी स्पर्धक तहेसिन पुनावाला यांनी दिले आहे. तहेसिन पुनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत ट्रोलर्सवर निशाणा साधला असून ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले आहे.

संयमाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक

टिझर मध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांचा अर्थ ट्रोल करणाऱ्यांना समजलेला नसून ते हसू साधे किंवा निष्काळजी नाही. ते संयमाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ती धोक्याच्या क्षणी शांत राहणाऱ्या सैनिकांची भावना आहे. समोर शत्रू असताना घाबरून जाता समोर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी हेच ते हसू दर्शवते. म्हणजेच सैनिकाला माहिती असतं कि, पुढे काय आहे, तरी डगमगता तो ठाम पणे उभा राहतो. असं या ट्विट मध्ये तहेसिन पुनावाला यांनी लिहिलंय.

ते हसू कमजोरी नाही ते स्वीकार आहे

रणांगणात उतरणाऱ्या सैनिकांसाठी दोन पर्याय असतात. जिंकणे आणि देशाचे रक्षण करणे किंवा देशासाठी बलिदान देणे. हे दोन्ही सैनिकांसाठी विजय असतात. जखम झाल्यास त्याला पदक समजा आणि मृत्यू समोर आला कि त्याला सलाम कराया ओळी सैनिकांच्या मसनिकतेचे प्रतिबिंब आहे. ते हसू कमजोरी नाही ते स्वीकार आहे. धैर्य आहे असं देखील या पोस्ट मध्ये तहेसिन पुनावाला यांनी लिहिले आहे.

चित्रांगदा सिंग देखील मुख्य भूमिकेत

बॅटल ऑफ गलवान या चित्रपटामध्ये सलमान खान मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचीथा भारत चीन मध्ये 2020 या साली गलवान खोऱ्यात झालेल्या संघर् यावर आधारित आहे. अभिनेता सलमान खान सोबत चित्रपटात चित्रांगदा सिंग देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts