Top News

बहुचर्चित चित्रपट देऊळबंद २ चा थरारक टीझर प्रदर्शित

DeoolBand 2

DeoolBand 2 : वटवृक्ष एंटरटेनमेंट द्वारे निर्मित व प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद २… आता परीक्षा देवाची या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा, संघर्ष आणि थरार यांचा संगम दाखवणारा हा टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

देऊळबंद’च्या पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘आता परीक्षा देवाची’ या नव्या पर्वात कथा अधिक प्रभावी आणि भव्य स्वरूपात मांडण्यात येणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट दिसत आहे. प्रवीण तरडे यांच्या खास शैलीतील दमदार संवाद, उत्कंठावर्धक दृश्यरचना आणि भावनिक संघर्ष यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. यात शेतकरी महिला व श्री स्वामी समर्थ यांच्यातला संवाद व कथा अतिशय मनोरंजक व भावनिक असणार याबद्दल काही दुमत नसेल.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर जेव्हा लाँच झाला होता तेव्हा पोस्टरला चाहत्यांचा भरपूर पसंती पडल्याची दिसली. टीझरमध्ये श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला असून, प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे आहे. या चित्रपटात श्री स्वामी यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी तर शेतकरी महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री स्न्हेल तरडे असणार आहे. त्यासोबतच मंगेश देसाई , प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार देखील असणार आहेत.

टीझर लाँच होताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया उमटत असून, “देऊळबंद २” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलर आणि प्रदर्शन तारखेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts