Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • गुन्हा
  • आधी नसरापूर,आता पर्वती: आजोबांकडून नातीवरच बलात्काराचा प्रयत्न
Pune

आधी नसरापूर,आता पर्वती: आजोबांकडून नातीवरच बलात्काराचा प्रयत्न

Parvati Rape Attempt

Parvati Rape Attempt : पुणे जिल्ह्याचा भोर तालुक्यात नसरापूर (Nasrapur Rape Case) येथे नुकतीच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडलेली असतानाच, परत अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील पर्वती भागात घडली. पुण्यातील पर्वती भागात एका ७० वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवरच बलात्काराचा प्रयत्न करण्याची अतिशय हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे पर्वती भागात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा करण्यासाठी नागरिकांचा संताप दिसून येत आहे. यासंबंधी आरोपी आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

नेमके घडले काय?

पुणे शहरातील पर्वती भागात राहणाऱ्या एका ७० वर्षीय आजोबाने आपल्या सख्ख्या नातीवरच लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहिती नुसार दिनांक २ मे २०२६ च्यारात्री ९:३० च्या सुमारास हा प्रकार घडला. नातं व नातू आपल्या आजोबाला भेटायला आले असताना आरोपी आजोबाने नातवास पैसे देऊन खाऊ खाऊन येण्यास सांगितले. नातू बाहेर गेल्यानंतर नराधम आजोबाने नातीचे व आपले कपडे काढले. पीडित मुलगी रडत असल्याने तेथील रहिवाशी नागरिकांना संशय आला त्यांनी सर्व प्रकार पाहून पीडित मुलीची सुटका केली व मोठा अनर्थ टाळला. आरोपीला चांगला चोप देऊन नंतर पोलिसांकडे सोपवण्यात आले.

नागरिकांचा संताप

या घटनेनंतर संपूर्ण पर्वती परिसरात रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी रात्रभर पार्वती पोल्स स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. घडलेल्या घटनेवर अतिशय संताप व्यक्त करत ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या ‘अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली. या घटनेच्या निषेधार्थ पर्वती पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर नागरिकांना पोलिसांनी समजावून शांत केले व पीडित मुलगी सुखरूप असून ससून मध्ये दाखल केल्या गेल्याचे सांगितले आहे. नसरापूर प्रकरणानंतर लगेच घडलेल्या या प्रसंगामुळे सरकार याविरोधात काय कठोर पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts