Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 29 टीएमसी क्षमता, 43 टीएमसी आवक! जुलैत खडकवासला धरण साखळीने रचला जलविक्रम
Pune

29 टीएमसी क्षमता, 43 टीएमसी आवक! जुलैत खडकवासला धरण साखळीने रचला जलविक्रम

Khadakwasla Dam
42

Khadakwasla Dam: जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासका धरण साखळीत तब्बल ४३ टीएमसीहून अधिक पाण्याची आवक झाली. २९.१५ टीएमसी क्षमतेची चारही धरणे शंभर टक्के भरल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने १७ टीएससी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार आणि सातत्यपूर्ण पावसामुळे खडकवासला धरण साखळीत विक्रमी पाणीसाठा जमा (Khadakwasla Water Level) झाला आहे. अवघ्या एका महिन्यात धरण क्षेत्रात तब्बल 43 टीएमसीहून (43 TMC Inflow) अधिक पाण्याची आवक झाली असून, हा आकडा धरण साखळीच्या एकूण साठवण क्षमतेच्या दीडपट असल्याची माहिती जलसंपदा विभागाने (Water Resources Department) दिली आहे.

हेही वाचा: वृद्धी योगामुळे ‘या’ दोन राशींचे नशीब उजळणार? धनलाभाचे संकेत; वाचा १२ राशींचे राशिभविष्य

खडकवासला धरण

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा समावेश असून, या चारही धरणांची एकत्रित साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे चारही धरणे 100 टक्के भरली आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग

धरणांमध्ये सतत वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेता जलसंपदा विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला. जुलै महिन्यात एकूण 17 टीएमसी पाणी धरण साखळीतून सोडण्यात आले, तर त्यापैकी 12.33 टीएमसी पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात करण्यात आला. LS Marathi News Channel

पुणेकरांसाठी मोठा दिलासा

धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणे शहरासह (Pune News) परिसराच्या पाणीपुरवठ्याबाबत (Water Supply मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, नदीकाठच्या नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, धरणातून आवश्यकतेनुसार पुढील काळातही पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला जाऊ शकतो, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts