Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महिला आरक्षण विधेयकाविरोधात मतदान केल्यानं भाजपाचं राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; निषेध करत जाळला पुतळा
ताज्या बातम्या

महिला आरक्षण विधेयकाविरोधात मतदान केल्यानं भाजपाचं राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; निषेध करत जाळला पुतळा

महिला आरक्षण विधेयकाविरोधात मतदान केल्यानं भाजपाचं राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; निषेध करत जाळला पुतळा

नवी दिल्ली BJP Protest : आज (शनिवारी) दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर भाजपाच्या नेते आणि कार्यकर्ते भव्य आंदोलन केलं. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यास काँग्रेस पक्षानं दिलेल्या नकाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांनी मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्त्यांसह या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

हेही वाचा : ‘विरोधी पक्षांनी मोठी चूक केली, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’; महिला आरक्षणावरुन पंतप्रधान मोदींची टीका

विरोधी पक्षानं देशातील महिलांचा विश्वासघात केला – बासुरी :

भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या, “काल संपूर्ण विरोधी पक्षानं, विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या देशातील महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी महिलांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना महिलांची भूमिका केवळ मतदान केंद्रांपुरती मर्यादित ठेवायची आहे. जेव्हा राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा ते स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देतात. त्यांनी महिलांचा विश्वासघात केला आहे.”

विधेयकाच्या अपयशानं महिला निराश – हेमा मालिनी :

दरम्यान, भाजपा खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, “त्यांनी विधेयक मंजूर होऊ दिलं नाही. म्हणूनच आम्ही सर्वजणी इथं आंदोलन करत आहोत. या आंदोलनात भारतातील महिला एकजूट झाल्या आहेत. काल आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांनी विधेयक मंजूर होऊ दिले नाही. यामुळं आम्ही खूप निराश झालो आहोत. देशभरातील महिला आंदोलन करत आहेत.”

विरोधी पक्षांनी महिलांना आव्हान दिलं – मनोज तिवारी :

तसंच, खासदार मनोज तिवारी म्हणाले, “काल लोकसभेत विधेयक फेटाळलं गेलं तेव्हा तुम्ही पंतप्रधान मोदींचा चेहरा पाहिला असेल. त्यांनी आपले अश्रू आणि वेदना कशा आवरल्या. त्या क्षणी मला उठावंसंही वाटलं नाही. काँग्रेस, आप, टीएमसी, एसपी आणि डीएमके यांनी या देशातील महिलांना आव्हान दिलं आहे. महिला त्यांना उत्तर देतील. मला आनंद आहे की त्या आज इथं आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत.”

विधेयक लोकसभेत का मंजूर झाले नाही? :

हे उल्लेखनीय आहे की, गेल्या शुक्रवारी सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित 131 वी दुरुस्ती विधेयक सादर केले, परंतु ते दोन-तृतीयांश बहुमतानं मंजूर होऊ शकलं नाही. त्याच्या विरोधात 230 मतं पडली आणि विधेयकाला आवश्यक असलेली 352 मतं मिळाली नाहीत. या संदर्भात भाजपाच्या महिला खासदारांनी काल संध्याकाळी संसदेत आंदोलनही केलं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts