Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदेंची सोलापूरात मोठबांधणी, ३ महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश
Top News

एकनाथ शिंदेंची सोलापूरात मोठबांधणी, ३ महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Eknath Shinde Solapur Party Entry

Eknath Shinde Solapur Party Entry : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी केल्यापासून ते आतापर्यंत शिंदे सेनेत रोज मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. अलिकडेच पार परलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यांचा संपूर्ण राज्याला परिचित झाले. अशातच सोलापूरच्या स्थानिक राजकारणातून अशीच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सेनेत स्थानिक नेत्यांसह अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश झाला आहे. काँग्रेस आणि पक्षातून मोठ्या नेत्यांनी शिंदे सेनेत प्रवेश प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठं बळ मिळणार आहे.

भगिरथ भालकेंसह ३ बड्या नेत्यांचा समावेश

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश करण्यात आला.

भगीरथ भालके पंढरपूरात विकासाची गंगा आणतील

जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके हे पंढरपूरात विकासाची गंगा नक्की आणतील, या पक्षप्रवेशावर बोलताना शिंदे म्हणाले. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असून भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे नमूद करत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

डरकाळी ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत

काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे, पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील, अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे अधोरेखित केलं. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. काही चॅनलवालेच डरकाळी फोडत आहेत. ती ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांमुळे आणि भगव्याच्या शानमुळेच दररोज हजारो नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत, असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, यावेळी अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts