Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • येणाऱ्या काळात आर्थिक आणीबाणीची शक्यता? शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
ताज्या बातम्या

येणाऱ्या काळात आर्थिक आणीबाणीची शक्यता? शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Sharad Pawar Economic Emergency: देशातील ऊर्जा संकट आणि इराण- अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे “आर्थिक आणीबाणी” या मुद्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

इराण- अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचाSharad Pawar economic emergency परिणाम भारतावरही जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांनी काटकसरीचे आवाहन केले असून इंधन बचतीवर भर देण्याचे सुचवले आहे. याच अनुषंगाने विविध राज्यांतील मंत्री आणि नेत्यांनी आपल्या वाहन ताफ्यात कपात करण्याचे निर्णय घेतले आहेत. काही नेत्यांनी परदेश दौरेही रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य करत सर्वपक्षीय बैठक घेऊन केंद्र सरकारने सर्वाना विश्वासात घ्यावे. अशी मागणी केली.

हेही वाचा: मोठी बातमी! राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

आर्थिक आणिबाणीबाबत पवारांचे सूचक वक्तव्य

पत्रकार परिषदेत “देशात आर्थिक आणीबाणी येऊ शकते का?” असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. सरकारच्या भूमिकेशी सुसंगतपाने वागले आणि सातत्य ठेवले तर अशी परिस्थिती टाळता येऊ शकते, मात्र याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात असून चर्चा सुरू झाली आहे.

“एक-दोन दिवसांच्या उपायांनी फरक पडणार नाही”

वाहतूक आणि इंधन बचतीच्या उपायांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, जर हे फक्त एक-दोन दिवसांसाठी असेल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण उपायांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, काही नेत्यांनी दाखवलेले काटकसरचे निर्णय केवळ दिखावा न होता त्यात सातत्य ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वक्तव्यानंतर “आर्थिक आणीबाणी” या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts