Who will become the mayor of Malegaon : मालेगाव महानगरपालिकेची (Malegaon Municipal Corporation) निवडणूक पार पडली असून कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने आत्ता सत्ता स्थापनेचा आणि महापौर (Mayoral election) बसविण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून इस्लाम पार्टी समोर आली असली तरी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) ऐन वेळी काय खेळी खेळतात (The situation will change at the last moment) याकडे सर्व शहराचे लक्ष लागून आहे. त्यामुळे मालेगाव महापालिकेत कोणाचा होणार महापौर (Who will become the mayor?) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालेगावच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून इस्लाम पार्टी समोर आली असून एकूण 84 नगरसेवकांच्या जागेपैकी इस्लाम पक्षाचे 35 नगरसेवक निवडून आले आहे. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीची युती असल्याने त्यांचे 5 नगरसेवक तर काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक यांनी देखील इस्लाम पार्टीला समर्थन दिल्याने सत्ता स्थापन करण्यासाठीची 43 नगरसेवकांची मॅजिक फिगर इस्लाम पार्टी गाठत असल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र, फोडाफोडीच्या राजकारणामुळे ऐनवेळी काही चित्र पाहायला मिळू शकते.
हेही वाचा – ‘निवडणूक हरल्यानंतर न्यायालयाचा आधार घेऊ नका’; सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत किशोर यांच्या जन सूराजला फटकारलं
काँग्रेसच्या ३ नगरसेवकांचा इस्लाम पार्टीला पाठिंबा
विधानसभा निवडणुकीत असिफ शेख यांच्या समोर उभे असलेले काँग्रेसचे एजाज बेग यांनी आपल्या तीन नगरसेवकांसोबत इस्लाम पार्टीला पाठिंबा दिला. राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रीत येत इस्लाम पार्टीला पाठिंबा दिल्याचे एजाज बेग यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला MIM चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली MIM पक्षाने देखील 21 जागा जिंकल्या. मात्र त्यांनी महापौर पदासाठी नाही तर उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख हे त्यांचे पारंपरिक विरोधक असल्याने सत्ता स्थापनेसाठी ते मंत्री दादा भुसे यांच्याशी हातमिळवणी करतील अशी चर्चा आहे.
शिंदे सेनेने महापौर पदासाठी 3 तर उपमहापौर पदासाठी 6 फॉर्म भरले
या पूर्ण नाट्यमय घडामोडीत शिंदे सेनेने मौन बाळगले आहे. शिंदे गटाचे 18 नगरसेवक, MIM चे 21 हे दोन्ही मिळून 39 नगरसेवक होतात आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोघांना मिळून चार नगरसेवकांची आवश्यकता आहे. गटनेता नगरसेवक निलेश आहेर यांनी बोलण्यास नकार जरी दिला तरी शिंदे सेनेने महापौर पदासाठी 3 तर उपमहापौर पदासाठी तब्बल 6 फॉर्म भरल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्यामुळे मंत्री दादा भुसे आता काय खेळी खेळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची जोरदार मोर्चेबाधणी सुरू
एकंदरीत शिवसेनेला सत्ते पासून दूर ठेवण्याचे इस्लाम पार्टीचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी शिंदे सेनेने देखील सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिंदे गटाचे 18 नगरसेवक, MIM चे 21 हे दोन्ही मिळून 39 नगरसेवक होतात आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोघांना मिळून चार नगरसेवकांची आवश्यकता आहे. तर इस्लाम पार्टी, समाजवादी पक्ष मिळून 40 नगरसेवक आहे. त्यांना मॅजिक फिगर गाठण्यासाठी तीन नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या सत्ता बसविण्यात भाजपचे दोन नगरसेवक तर काँग्रेसचे तीन असे दोन्ही पक्ष मिळून पाच नगरसेवकांच्या हातात हा गेम असल्याचे आता बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सात तारखेला समजेल की कोणाचा महापौर बसतो आणि कोणत्या पक्षाची सत्ता येते.








