Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू, येऊरच्या परिसरात आढळले मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
ताज्या बातम्या

धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू, येऊरच्या परिसरात आढळले मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

A four-year-old male leopard died
140

Dead bodies were found in the Yeoor area : भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला (Attack on citizens in the Bhaindar area) करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू (A four-year-old male leopard died) झाल्याची माहिती समोर आली आहे. येऊर वनक्षेत्रातील नागला परिसरात या बिबट्याचे मृतदेह (Leopard carcass) आढळून आले आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदनाचा अहवाल (Autopsy report) आल्यानंतरच कारण समजणार असल्याचे वन विभागाकडून (Forest Department) सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – ओला, उबेर आणि रॅपिडोच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या टॅक्सी, रिक्षा चालकांचा देशव्यापी संप, प्रवाशांचे हाल होणार..

भाईंदर पूर्वेतील तलाव रोड या वर्दळीच्या भागात १९ डिसेंबर रोजी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर बिबट्याने एका इमारतीत शिरून सात नागरिकांवर हल्ला केला होता. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुमारे सात तास चाललेल्या प्रयत्नांनंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो नियमितपणे शिकार करत असून सुदृढ असल्याचे निरीक्षणात आले होते. मात्र, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सॅटेलाइट कॉलरद्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा संदेश वन विभागाला मिळाला. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

तपासणीदरम्यान बिबट्याची नखे, दात तसेच इतर महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts