• Home
  • महाराष्ट्र
  • नरभक्षक वाघाला मारण्यासाठी 4 थर्मल ड्रोन, 65 कॅमेरे अन् 4 शार्प शूटर्स
Top News

नरभक्षक वाघाला मारण्यासाठी 4 थर्मल ड्रोन, 65 कॅमेरे अन् 4 शार्प शूटर्स

man eater tiger operation

man eater tiger operation : भंडाऱ्याच्या नवेगाव-नागझिरा (Bhandara Crime News) अभयारण्य भागात सध्या मृत्यूचं सावट पसरलंय. मागील काही दिवसांपासून एका नरभक्षक वाघाने (Man-eating Tiger) धुमाकूळ घातलाय. दोन निष्पाप जीवांचा बळी (Death of Two) घेतलाय. वनविभागाचे 100 हून अधिक कर्मचारी तैनात आहेत. आकाशातून ड्रोनने पाळत ठेवली जातेय, पण वाघ हुलकावणी देतोय. अशातच वनविभागाने गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी मानवी मुखवटे वाटून एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे.

दहशतीचे १९ दिवस…. भंडाऱ्याचा हा निसर्गरम्य परिसर… पण सध्या इथे पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा दहशतीची शांतताच जास्त जाणवतेय. बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव… या गावांमध्ये सध्या भीतीचं राज्य आहे. कारण आहे एक ‘नरभक्षक’ वाघ… गेल्या १९ दिवसांपासून या वाघाने गावकऱ्यांची झोप उडवलीय. दोन बळी घेतल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेलीय… प्रत्येक पावलावर मृत्यू दबा धरून बसल्याची जाणीव ग्रामस्थांना होत आहे…

सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावकरी जंगलात जाण्याशिवाय राहू शकत नाहीत. म्हणूनच वनविभागाने आता टायगर रिपेलेंट म्हणून मानवी मुखवट्यांचा आधार घेतला आहे. हे मुखवटे डोक्याच्या मागच्या बाजूला लावले जातात. वाघ सहसा मागून हल्ला करतो, पण जेव्हा त्याला मागूनही चेहरा दिसतो, तेव्हा माणूस आपल्याकडेच पाहतोय असा भास त्याला होतो. वाघाला गोंधळात टाकून जीव वाचवण्याचा हा एक अनोखा सायकोलॉजिकल प्रयोग भंडाऱ्याच्या जंगलात सुरू आहे.

केवळ मुखवटेच नाही, तर वनविभागाने आता वाघाविरुद्ध हायटेक युद्ध पुकारलंय. 65 ट्रॅप कॅमेरे जंगलाच्या कानाकोपऱ्यात नजर ठेवून आहेत. 4 थर्मल ड्रोन आकाशातून वाघाची उष्णता टिपत मागोवा घेत आहेत. 7 लाईव्ह कॅमेरे थेट हालचाली नियंत्रण कक्षात पोहोचवत आहेत. इतकेच नाही तर 4 तज्ज्ञ शार्प शूटर्सना पाचारण करण्यात आलंय. सात ठिकाणी आमिष म्हणून जनावरं बांधली आहेत. पण हा नरभक्षक इतका चपळ आहे की, तो प्रत्येकवेळी वनविभागाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts