Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • अरेरे… Appleचा मोठा गेम! iPhone 18 Pro लाँचनंतर जुन्या मॉडेल्स स्वस्त होण्याऐवजी चक्क महागले; नव्या किमती पाहून बसेल धक्का
विज्ञान- तंत्र

अरेरे… Appleचा मोठा गेम! iPhone 18 Pro लाँचनंतर जुन्या मॉडेल्स स्वस्त होण्याऐवजी चक्क महागले; नव्या किमती पाहून बसेल धक्का

iPhone 18 Pro Price Hike
14
iPhone 18 Pro Price Hike: काल, ९ सप्टेंबरला रात्री iPhone 18 ची दमदार एन्ट्री झाली आणि टेक मार्केटमध्ये चर्चांना उधाण आलं. पण नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्स स्वस्त होतील, अशी अपेक्षा असताना Appleने चक्क त्यांच्या किमती वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. चला तर जाणून घेऊयात iPhone 17 पासून Air पर्यंत नवे दर काय आहेत.

काल, ९ सप्टेंबरला रात्री Appleने बहुप्रतीक्षित iPhone 18 सीरिज सादर करताच जगभरातील टेकविश्वाचं लक्ष या नव्या फोनकडे वेधलं गेलं. नवीन फीचर्स, दमदार अपग्रेड्स आणि प्रीमियम किंमत यामुळे iPhone 18 ची जोरदार चर्चा सुरू असतानाच भारतातील Apple चाहत्यांना मात्र एका वेगळ्याच बातमीने धक्का दिला आहे. साधारणपणे नवीन iPhone बाजारात दाखल झाल्यानंतर मागील पिढीतील मॉडेल्सच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असते. मात्र, यावेळी Appleने नेमकं उलट केलं आहे.

भारतामध्ये iPhone 17, iPhone 17e, iPhone Air आणि iPhone 16 या जुन्या मॉडेल्सच्या अधिकृत किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही व्हेरिएंट्सच्या किमतीत हजारो रुपयांची वाढ झाली असून iPhone Air च्या 1TB मॉडेलची किंमत तब्बल 65 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे नवीन iPhone घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसमोर आता किंमतीचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे.

हेही वाचा: हिरवी साडी, गजरा अन् मराठीतून भाषण; राणी मुखर्जीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यातील अंदाज चर्चेत

iPhone 17 खरेदीसाठी आता मोजावे लागतील जास्त पैसे

iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी यापूर्वी 82,900 रुपये मोजावे लागत होते. आता त्याची किंमत 99,900 रुपये झाली आहे. याचबरोबर 512GB व्हेरिएंटही महागला आहे. या मॉडेलची जुनी किंमत 1,02,900 रुपये होती, तर आता ती 1,24,900 रुपये करण्यात आली आहे. अर्थात, iPhone 17 च्या दोन्ही स्टोरेज पर्यायांच्या किमतीत अनुक्रमे 17 हजार आणि 22 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

iPhone Air च्या 1TB मॉडेलची किंमत थेट 2 लाखांपार

Appleच्या दरवाढीचा सर्वात मोठा फटका iPhone Air च्या 1TB व्हेरिएंटला बसला आहे. याची किंमत पूर्वी 1,59,900 रुपये होती. आता या मॉडेलसाठी तब्बल 2,24,900 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच या एका व्हेरिएंटची किंमत तब्बल 65 हजार रुपयांनी वाढली आहे. iPhone Air च्या इतर मॉडेल्सनाही दरवाढीचा सामना करावा लागला आहे. 256GB व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपयांवरून 1,49,900 रुपये, तर 512GB व्हेरिएंटची किंमत 1,39,900 रुपयांवरून 1,74,900 रुपये झाली आहे.

iPhone 17e च्या दरातही मोठा बदल

iPhone 17e च्या किमतीतही Apple ने वाढ केली आहे. 256GB मॉडेल आता 79,900 रुपयांना उपलब्ध आहे. याआधी त्याची किंमत 64,900 रुपये होती. 512GB व्हेरिएंटसाठी आता 1,04,900 रुपये मोजावे लागतील. या मॉडेलची जुनी किंमत 84,900 रुपये होती.

iPhone 16 साठीही ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागणार

दरवाढीपासून iPhone 16 देखील सुटलेला नाही. 128GB स्टोरेज असलेल्या iPhone 16 ची किंमत आता 89,900 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी हे मॉडेल 69,900 रुपयांना मिळत होतं. त्यामुळे या फोनच्या किमतीत 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन iPhone 18 Pro सीरिजची एंट्री

दरम्यान, Apple ने आपल्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max या फ्लॅगशिप मॉडेल्सचे अनावरण केले आहे. कंपनीने याच कार्यक्रमात पहिला फोल्डेबल iPhone म्हणून iPhone Duo देखील सादर केला आहे.

भारतीय बाजारात iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर iPhone 18 Pro Max खरेदी करण्यासाठी किमान 1,79,900 रुपये खर्च करावे लागतील.

दरवाढीमागे नेमकं कारण काय?

नवीन iPhone लाँच झाल्यानंतर करण्यात आलेल्या या दरवाढीमागे स्मार्टफोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या वाढलेल्या किमती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेषतः मेमरी चिप्सच्या पुरवठ्यावर सध्या दबाव आहे. AI तंत्रज्ञानाचा विस्तार, मोठ्या प्रमाणावर उभारली जात असलेली डेटा सेंटर आणि प्रगत चिप्सची वाढती मागणी यामुळे मेमरी घटकांसाठी स्पर्धा वाढली आहे.

त्याचा थेट परिणाम इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या उत्पादन खर्चावर होत आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपसह विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या किमती वाढल्याने कंपन्यांवरही खर्चाचा दबाव वाढला आहे.

Appleचे तत्कालीन CEO Tim Cook यांनी यापूर्वी वाढत्या उत्पादन खर्चाबाबत चिंता व्यक्त केली होती. कंपनी ग्राहकांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र घटकांच्या किमतीतील वाढ मोठी झाल्याने ती कायमस्वरूपी टाळणं कठीण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यामुळे नवीन iPhone लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्स स्वस्त मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी Appleचा हा निर्णय अनपेक्षित ठरला आहे. भारतात iPhone खरेदी करण्यापूर्वी आता सुधारित किमती तपासणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts