Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मैदानावर रुग्णवाहिका, स्ट्रेचरही दिसलं; दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला गंभीर दुखापत
क्रीडा

मैदानावर रुग्णवाहिका, स्ट्रेचरही दिसलं; दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला गंभीर दुखापत

मैदानावर रुग्णवाहिका, स्ट्रेचरही दिसलं; दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला गंभीर दुखापत

नवी दिल्ली Lungi Ngidi Head Injury : इंडियन प्रीमियर लीग 2026 चा 35 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी झेल घेण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : अरे बापरे! सरावादरम्यान चेहऱ्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी; अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं

नेमकं काय झालं :

वास्तविक, पंजाब किंग्सच्या डावातील तिसरं षटक दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलनं टाकलं. त्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्याने एक मोठा फटका मारला. मात्र, त्याचा चेंडूशी ताळमेळ बसला नाही आणि चेंडू उंच उडाला. एनगिडीला झेल घ्यायचा होता, पण त्याला चेंडूचा अंदाज आला नाही आणि तो झेल घेण्याच्या प्रयत्नात तो डोक्यावर जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याचा मागचा भाग जमिनीवर जोरात आदळला.

मैदानावर आली रुग्णवाहिका :

वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जमिनीवर पडताच, एक डॉक्टर आणि फिजिओ तिथं पोहोचले. एनगिडी त्यांना प्रतिसाद देत होता, पण तो पूर्णपणे ठीक दिसत नव्हता. त्यानंतर मैदानावर स्ट्रेचर आणण्यात आलं. मैदानावर रुग्णवाहिका दाखल झाली आणि त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आलं. हे लक्षात घ्यावं की, पंजाब किंग्सचा डाव सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सने अकीब नबीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरलं होतं. मात्र, डोक्याला दुखापत झाल्यामुळं लुंगी एनगिडीच्या जागी दुश्मंथा चमीराला बदली खेळाडू म्हणून खेळवण्यात आलं.

दिल्लीसमोर 265 धावांचं लक्ष्य :

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या 152 धावांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या निर्धारित 20 षटकांत 2 गडी गमावून 264 धावा केल्या. नितीश राणानंही 91 धावांची शानदार खेळी केली. आयपीएलमधील दिल्लीची ही सर्वोच्च धावसंख्या होती.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts