• Home
  • क्रीडा
  • भारतानं 20व्यांदा गमावली नाणेफेक; प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण, संघात कोणतेही बदल नाही
क्रीडा

भारतानं 20व्यांदा गमावली नाणेफेक; प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण, संघात कोणतेही बदल नाही

india team loss toss in 20 time

India loses toss 20th time : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं सलग 20 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन बदल झाले आहेत. टेम्बा बावुमा, केशव महाराज आणि लुंगी न्गिडी हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आले आहेत. तर, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

 

टीम इंडियानं पहिला सामना 17 धावांनी जिंकला :

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 49.2 षटकांत 332 धावा केल्या, ज्यामुळं भारताला 17 धावांचा विजय मिळाला. भारतीय संघाच्या सर्वाधिक धावसंख्या असूनही, दक्षिण आफ्रिकेनं चांगला खेळ केला आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जिवंत ठेवला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा उतरणार मैदानात :

रांची इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीनं सामन्याभोवतीचा उत्साह आणखी वाढवला आहे. विराट कोहलीनं रांची कसोटीत शतक झळकावलं तर रोहित शर्मानंही आपलं अर्धशतक दमदारपणे पूर्ण केले. कर्णधार केएल राहुलनंही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे ही वाचा : कधी होणार भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे? रोहित-विराट उतरणार मैदानात

सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11:

भारत : यशस्वी जैसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वाशिंगटन सुंदर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रविंद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण अफ्रीका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), मैथ्यू ब्रीट्जके, टोनी डी जोरजी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जेनसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नंद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts