Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पहिल्या सामन्यात मोठे बदल? भुवनेश्वर कुमार IN, वैभव सूर्यवंशी OUT; पाहा संभाव्य Playing XI
क्रीडा

पहिल्या सामन्यात मोठे बदल? भुवनेश्वर कुमार IN, वैभव सूर्यवंशी OUT; पाहा संभाव्य Playing XI

India vs New Zealand
24
India vs New Zealand: भारत- न्यूझीलंड पहिल्या टी २० सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची चर्चा रंगली आहे. भुनेश्वर कुमार आणि शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता असून, वैभव सूर्यवंशीला बाहेर बसावे लागू शकते. पाहा, अशी असू शकते भारताची संभाव्य Playing XI!

India vs New Zealand T20 Series 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी २० मालिकेचा (India vs New Zealand) थरार सुरू होणार असून पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यात भारतीय संघाची रणनीती ( India Playing XI ) काय असेल, कोणत्या खेळाडूंना अंतिम अकारामध्ये स्थान मिळेल आणि कोणाला बाकावर बसावे लागेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः भुवनेश्वर कुमारचे ( Bhuvneshwar Kumar ) पुनरागमन, शिवम दुबेची अष्टपैलू भूमिका आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात २ राशींवर पैशांचा वर्षाव? कोजागिरीपूर्वी जाणून घ्या राशिभविष्य

भारत आणि न्यूझीलंड (India predicted XI) यांच्यातील ही पाच सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल, मात्र, न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्यासाठी भारतीय खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी?

पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधला जाण्याची शक्यता आहे. सलामीच्या फलंदाजांपासून ते वेगवान गोलंदाजांपर्यंत प्रत्येकाची भूमिका निर्णायक ठरू शकते.

उपलब्ध संभाव्य संघरचनेनुसार, संजू सॅमसन याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असू शकते. अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे आक्रमक फलंदाजी करू शकतात, तर श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा मधल्या फळीत डावाला स्थैर्य देऊ शकतात.

शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू फलंदाजीला खोली देऊ शकतात. गोलंदाजी विभागात अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य Playing XI

संजू सॅमसन (यष्टिरक्षक)
अभिषेक शर्मा
इशान किशन
श्रेयस अय्यर (कर्णधार)
तिलक वर्मा (उपकर्णधार)
शिवम दुबे
नितीश कुमार रेड्डी
अक्षर पटेल
भुवनेश्वर कुमार
वरुण चक्रवर्ती
अर्शदीप सिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts