Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ट्रिस्टन स्टब्स-केएल राहुलची अर्धशतकी खेळी; दिल्लीचा हंगामातील तिसरा विजय
क्रीडा

ट्रिस्टन स्टब्स-केएल राहुलची अर्धशतकी खेळी; दिल्लीचा हंगामातील तिसरा विजय

केएल राहुलची शानदार खेळी; दिल्लीडून राजस्थान घरच्या मैदानावर पराभूत

बंगळुरु DC Beat RCB : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 26वा साखळी सामना बेंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. यात दिल्लीनं 5 विकेटनं विजय मिळवला. यासह दिल्लीचा हा तिसरा विजय ठरला आहे, आरसीबीला हंगामात दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

हेही वाचा : कर्णधार गिलची शानदार खेळी गुजरातचा सलग तिसरा विजय; KKR चा पाचवा पराभव

केएल राहुलचं अर्धशतक :

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं दिल्लीसमोर 176 धावांचं लक्ष्य ठेवलं, दिल्ली कॅपिटल्सनं एक चेंडू शिल्लक असताना 179 धावा करत विजय मिळवला. संघाला डेव्हिड मिलरनं शेवटच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारुन विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं 47 चेंडूंमध्ये 60 धावा करुन संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, तर केएल राहुलनं 34 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. पाच सामन्यांमधील दिल्लीचा हा तिसरा विजय ठरला.

आरसीबीची फलंदाजी अपयशी :

तत्पुर्वी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. आरसीबीकडून फिल सॉल्टनं सर्वाधिक 63 धावा केल्या, तर टीम डेव्हिडनं 26 आणि विराट कोहलीनं 19 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून लुंगी एनगिडी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, तर मुकेश कुमारलाही एक बळी मिळला.

आरसीबीचा बंगळुरुमध्ये 100वा आयपीएल सामना :

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं घरचं मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम आहे, जिथं त्यांनी पहिल्या हंगामापासून आपले घरचे सामने खेळले आहेत. जेव्हा आयपीएल 2026 मध्ये आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला, तेव्हा तो बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील त्यांचा 100वा सामना होता. यासह, आरसीबी आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं इथं 99 सामने खेळले होते, ज्यात त्यांनी 49 सामने जिंकले आणि 46 गमावले. याशिवाय, चार सामन्यांचा निकाल लागला नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts