Prajakt Tanpure BJP Entry : राहुरी पोटनिवडणुकीत (Rahuri By-election) गेम बदलणार आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते माजी आमदार प्रजाक्त तनपुरे (Prajakt Tanpure) भाजपमध्ये पक्ष प्रवेश (Joining the BJP) करणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज्यात सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. बारामतीतून काँग्रेस उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे (Withdrawal of Candidature) घेतला आहे. तर राहुरीतून तरपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी फोन केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
यानंतर आता सध्या चर्चा सुरु आहे की तनपुरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे..प्राजक्त तनपुरे यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी २० एप्रिल रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी राहुरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे तनपुरे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – “उद्धव ठाकरे अन् एकनाश शिंदे एकाच ताटात जेवतात…”, बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
तनपूरेंच्या भाजप प्रवेशाला जयंत पाटलांचा पाठीबा? प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचा भाच्चा आहे
शरद पवार गटाचे जेष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा आहे. शरद पवार गटाचे महत्त्वाचे मानले जाणारे पाटील यांचेच भाचे असणारे तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याने या पक्ष प्रवेशाला जयंत पाटील यांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती..जयंत पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होताच, त्यांना मंत्री पद मिळणार असं म्हटलं जातं होतं..मात्र जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही, आणि या सर्व चर्चा वायफळ ठरल्या.
भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन
मात्र आता दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तनपुरे आमच्या सोबत आले तर आनंदच होईल असे सांगितले. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही तनपुरे यांना भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यामुळे प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार का, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते. तनपुरे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. तनपुरे नेमका कोणाचा प्रचार करणार की तटस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयंत पाटीलांचे भाचे तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित
मात्र जयंत पाटील यांचे भाचे तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करण्या मागचे कारण काय आहे. तर सध्या शरद पवार गट सत्तेतून बाहेर आहे, भविष्यात सत्ता कधी येईल, याबाबत कुणालाही माहिती नाही. तसेच शरद पवार गटाकडे विधानपरिषेदवर निवडून जाण्यासाठी देखील संख्याबळ नाही. त्यामूळे तनपुरे हे सध्या विधानपरिषेदवर जाऊ शकत नाही. तसेच त्यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल तर थेट 2029 च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे..
उमेदवारी मागे घेण्यासाठी थेट फडणवीसांचा फोन
तनपुरे यांना राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केला होता…यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, यावेळी फडणवीसांनी तनपुरे यांना विधानपरिषदेवर पाठवू असा शब्द दिला असावा, अशी शंका आहे. भाजपमध्ये तनपुरे यांना महत्त्वाची पदं मिळू शकतात. त्यामूळे तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे म्हटले जात आहे.
शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे आपल्या कुटुंबाचे राजकीय करिअर सोयिस्कर करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांना भाजपमध्ये पाठवू शकतात, अशीही चर्चा आहे. त्यामूळे तनपुरे यांच्या पक्ष प्रवेशाला जयंत पाटील यांचा पाठिंबा असणार का? जयंत पाटील तनपुरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला या पक्ष प्रवेशाविषयी काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा.










