Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कर्णधार गिलची शानदार खेळी गुजरातचा सलग तिसरा विजय; KKR चा पाचवा पराभव
क्रीडा

कर्णधार गिलची शानदार खेळी गुजरातचा सलग तिसरा विजय; KKR चा पाचवा पराभव

कर्णधार गिलची शानदार खेळी गुजरातचा सलग तिसरा विजय; KKR चा पाचवा पराभव

अहमदाबाद GT Beat KKR : आयपीएल 2026 च्या 25व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 20 षटकांत 180 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात गुजरातनं शेवटच्या षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. यासह गुजरातनं हंगामातील तिसरा विजय मिळवला असून केकेआरला पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

हेही वाचा : टी-20 विश्वचषकात मॅच फिक्सींग? आयसीसीकडून सखोल चौकशी सुरु, क्रिकेटविश्वात खळबळ

सामन्यात काय झालं :

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅमेरून ग्रिनच्या 79 धावांच्या खेळीच्या बळावर कोलकातानं 20 षटकांत सर्वबाद 180 धावा केल्या. कोलकाताच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, गुजरात टायटन्सनं शानदार कामगिरी करत शेवटच्या षटकात पाच गडी गमावून 181 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. संघाकडून कर्णधार शुभमन गिल गुजरातच्या विजयाचा नायक ठरला, त्यानं आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 50 चेंडूंमध्ये 86 धावा केल्या. जोस बटलरनं 25 धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे, गुजरातनं आपला सलग तिसरा सामना जिंकला आणि गुणतालिकेत लक्षणीय झेप घेतली.

कोलकाताची खराब कामगिरी :

कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्यांनी सहापैकी पाच सामने गमावले आहेत आणि पंजाबविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना केवळ एक गुण मिळाला आहे. केकेआर सध्या गुणतालिकेत तळाशी आहे आणि या पराभवामुळं त्यांच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts