Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • ट्विशा शर्मा केसला नवे वळण! एम्स दिल्लीचे पथक भोपाळला दाखल, दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम होणार
Top News

ट्विशा शर्मा केसला नवे वळण! एम्स दिल्लीचे पथक भोपाळला दाखल, दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम होणार

Twisha Sharma Death Case | सध्या संपूर्ण देशभरात ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाने (Twisha Sharma Death Case) खळबळ उडाली आहे. मॉडेल ट्विशा शर्मा ही भोपाळमधील (Bhopal) तिच्या सासरच्या घरी संशयास्पद मृतावस्थेत आढळली होती. त्यामुळे ट्विशा शर्माची हत्या तिच्या सासूने आणि तिचा पती समर्थ सिंहने केली असल्याचा गंभीर आरोप ट्विशाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच त्यांनी ट्विशाचा दुसऱ्यांचा पोस्टमॉर्टम करण्याची विनंती देखील केली होती. त्यामुळे आता ट्विशा शर्माच्या मृतदेहाचा दुसऱ्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ट्विशा शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट! सासूच्या फोन कॉल्समुळे संशय गडद, कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

ट्विशाचे शवविच्छेदन दुसऱ्यांदा करण्यात येणार

आज (24 मे) ट्विशा शर्माच्या मृतदेहाचे दुसरे शवविच्छेदन करण्यासाठी दिल्लीतील एम्स (AIIMS) येथील एक पथक भोपाळमध्ये दाखल झाले आहे. या पथकामध्ये चार वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी एम्सच्या डॉक्टरांच्या एका पथकाला नव्याने शवविच्छेदन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार आता हे पथक भोपाळमध्ये दाखल झाले आहे.

दिल्ली एम्सच्या डॉक्टरांचे पथक आज भोपाळमध्ये दाखल झाले असून ते आता ट्विशाच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करणार आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी एम्सचे पथक अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह भोपाळमध्ये पोहोचले आहे. तर ट्विशाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण कायदेशीर प्रक्रियेनुसार केले जाणार आहे. दिल्ली एम्समधील एक पथक हे शवविच्छेदन करणार आहे. यादरम्यान ट्विशाचे कुटुंबीय देखील भोपाळ एम्समध्ये उपस्थित राहणार आहेत.

मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. तसेच ट्विशाचा पती समर्थला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सासू गिरीबाला यांची देखील चौकशी केली जात आहे. सोबतच समर्थचा वकिलीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, 12 मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स येथील सासरच्या घरी ट्विशाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होती. त्यामुळे ट्विशाची आत्महत्या होती की हत्या, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात असून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच ट्विशाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिचा पती समर्थ सिंह आणि तिची सासू गिरिबाला यांनी तिची हत्या केली. त्यामुळे ट्विशाचा दुसऱ्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. तर मागील 11 दिवसांपासून ट्विशाचा पती समर्थ हा फरार होता. तर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts