D Roopa Moudgil IPS : एक अशा महिला IPS अधिकारी ज्याचं नाव ऐकताच गुन्हेगार देखील होतात गपगार, UPSC 2000 मध्ये AIR 43, कर्नाटक राज्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी, देशातील पहिल्या महिला सायबर क्राइम प्रमुख, 2 वेळा राष्ट्रपती पदक, तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करण्याचं दाखवलं होतं धाडस आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बदल्यांच्या बाबतीत सिंघम तुकाराम मुंढे यांनाही टाकलं मागे, मुंढेंच्या 21 वर्षांत 25 बदल्या, तर या महिला IPS अधिकाऱ्याच्या 20 वर्षांत 40 बदल्या… मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या, भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, गुन्हेगारांना गपगार करणाऱ्या कोण आहेत या लेडी सिंघम? पाहूयात, या धडाकेबाज महिला IPS अधिकाऱ्याची शौर्यगाथा… कर्नाटकच्या ‘लेडी सिंघम’ डी. रूपा मौदगिल! बदल्यांमध्ये मुंढेंनाही टाकलं मागे, 20 वर्षांत 40 बदल्या!
20 वर्षांत 40 बदल्या! कर्नाटकच्या ‘लेडी सिंघम’ D. रूपा मौदगिल यांची शौर्यगाथा ( D Roopa Moudgil IPS )
नमस्कार… महाराष्ट्राचे FDA आयुक्त डॅशिंग ऑफिसर तुकाराम मुंढे 21 वर्षात 25 बदल्या पण D. रूपा यांनी त्यांचाही रेकॉर्ड मोडला. 20 वर्षात 40 बदल्या! या आहेत कर्नाटकच्या पोलिस महानिरीक्षक लेडी सिंघम आयपीएस D. रूपा दिवाकर मौदगिल ( D Roopa Moudgil ) ! मुख्यमंत्र्यांना अटक केली, तुरूंगातला VIP ट्रीटमेंट घोटाळा उघड केला आणि आजही न डगमगता या महिला IPS अधिकारी खाकी वर्दीतल्या ‘काली’ बनून उभ्या आहेत. पहिली पोस्टिंग धारवाड जिल्ह्याच्या SP म्हणून नंतर गदग, बिदर, यादगीर जिल्ह्यांत बदली! यादगीर जिल्ह्याच्या पहिल्या SP ही तर त्यांच्यासाठी यादगार पोस्टिंग होती…आणि मग त्यांच्या सेवेला टर्निंग पॉइंट देणारं ते साल उजाडलं… 2007 , ठिकाण होतं धारवाड आणि त्या होत्या धारवाडच्या SP. कोर्टाचा आदेश आला मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करा… प्रकरण होतं 10 वर्षे जुना असलेला हुबळीतला दंगल खटला. डी. रूपा यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव होता. मुख्यमंत्र्यांना अटक करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण या बिकट परिस्थितीत देखील त्या न डगमगता उभ्या राहिल्या आणि कडाडल्या… कायदा सगळ्यांसाठी समान! मग काय, उमा भारती यांना अटक केली आणि दुसऱ्याच दिवशी देशभरात नाव पोचलं.. डी. रूपा मौदगिल! पुढल्याच वर्षी म्हणजे 2008 मध्ये आणखी एका मंत्र्याला अटक केली. नाव होतं… माजी मंत्री यवगल! या प्रकरणात आपलाच एक DSP गुन्हेगाराला मदत करतोय हे समजताच त्यांच्याविरूद्ध तडक कारवाई केली… आणि DSP मासुती Suspend!
बंगळुरूमध्ये आल्यावर तर त्यांनी धुमाकूळच घातला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना त्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला. शहर सशस्त्र राखीव दलाच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ताफ्यात परवानगीशिवाय वापरली जाणारी पोलीस वाहनं मागं घेतली. 8 नव्या कोऱ्या SUV परत घेतल्या. इतकंच नव्हे, तर 81 राजकारण्यांकडून 216 अनधिकृत अंगरक्षक परत घेतले. डी. रूपा यांच्या सेवेतली गाजलेली एक घटना तर पुढंच आहे. AIADMK नेत्या V. K. शशिकला यांना तुरूंगात मिळणारी VIP Treatment आणि त्याविषयी कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून डी. रूपा यांनी सादर केलेला धक्कादायक अहवाल…
हेही वाचा : नागपंचमीला या 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
फक्त 17 दिवसांत बदली; 2019 मध्ये अहवालाला पुष्टी
डी. रूपा या कर्नाटकच्या कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या मात्र त्याच काळात तुरूंगात असलेल्या AIADMK नेत्या V. K. शशिकला यांना मिळत असलेल्या कथित VIP Treatment चा प्रकार समोर आला. शशिकला यांना पाच कोठड्यांचा कॉरिडॉर, खास किचन, LED TV, AC आदी ऐषोरामाच्या सोयीसुविधा मिळत असल्याचा धक्कादायक अहवाल डी. रूपा यांनी सादर केला आणि सारा देश हादरला.
या अहवालामुळं त्या चांगल्याच चर्चेत आल्या. हा असा अहवाल दिल्यानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली पण 2019 मध्ये चौकशी समितीनं डी. रूपा यांचं म्हणणं 100% खरं असल्याचं सांगितलं. त्या कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून किती दिवस कार्यरत होत्या माहितीये… फक्त 17 दिवस! कारण नंतर हा अहवाल आणि तात्काळ बदली!
पुढं या प्रकरणी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं होतं… कारागृहं ही खरंतर अंधारकोठड्याच असतात, विशेषतः अत्यंत गरीब कैद्यांसाठी. गरीब कैद्यांना वाईट वागणूक मिळते, हे खूपच सर्रास घडतं पण श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना सर्व काही मिळतं. एलईडी टीव्ही, एअर कूलर, कधीकधी एनर्जी ड्रिंक्स ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरसुद्धा! विरोध आणि धमक्यांना सामोरं जावं लागूनही, पोलिस दलात सामील झाल्याचा आपल्याला पश्चात्ताप नाही, असंही या मुलाखतीत म्हटलं होतं. आणि आता जाता जाता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे बदल्यांचा…
20 वर्षांत 40 बदल्या; तुकाराम मुंढेंपेक्षाही अधिक
महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षात 25 बदल्यांची देशभरात चर्चा होतेय पण D. रूपा यांच्या 20 वर्षांत किती बदल्या झाल्यात माहितीये? तब्बल 40 बदल्या! बदल्यांमागचं कारण काय, तर भ्रष्टाचार उघड केला म्हणून, राजकारण्यांना आव्हान दिलं म्हणून, FIR मध्ये मंत्र्यांची नावं घेतली म्हणून! पण आपले मुंढे साहेब जसे बदल्यांना घाबरत नाहीत अगदी तशाच या डी. रूपा! त्या म्हणतात, बदली हा सेवेचा भाग. तत्त्वांशी तडजोड नाही. पोलीस दलात महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळं देशाची गाडी रूळावर आणण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी नागरी सेवेत आणि राजकारणात यायला हवं, हे त्यांचं आवाहन नक्कीच प्रेरणा देणारं आहे.
तर ही होती महिला IPS अधिकारी D. रूपा दिवाकर मौदगिल यांची शौर्यगाथा! एक अशा अधिकारी ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अटक करतानाही मागं पुढं पाहिलं नाही, ज्यांनी तुरूंगातला VIP Treatment घोटाळा उघड केला आणि ज्यांनी 20 वर्षांत तब्बल 40 बदल्या सहन केल्या पण झुकल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. जास्तीत जास्त महिलांनी नागरी सेवेत यायला हवं? तुम्हाला काय वाटतं? आणि हो ‘Women in Uniform’ हे डी. रूपा यांनी लिहिलेलं पुस्तक नक्की वाचा आणि कशी वाटली डी. रूपा मौदगिल महिला IPS अधिकाऱ्याची शौर्यगाथा? कमेंट करून नक्की सांगा


