Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • “आधी काम होऊ द्या मग पैसे द्या…”, मोटेगावकर करायचा लाखोंचे व्यवहार, NEET प्रकरणात RCC इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश
Top News

“आधी काम होऊ द्या मग पैसे द्या…”, मोटेगावकर करायचा लाखोंचे व्यवहार, NEET प्रकरणात RCC इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश

NEET Paper Leak Case | नीट पेपरफुटी प्रकरणामुळे (NEET Paper Leak Case) सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कारण या प्रकरणात महाराष्ट्रात सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली नीट-जेईई कोचिंगच्या संस्थेचे मालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच सध्या मोटेगावकरांची कसून चौकशी केली जात आहे. तर शिवराज मोटेगावकरांच्या अटकेनंतर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या त्यांच्या आरसीसी इन्स्टिट्यूट (RCC Institute) या कोचिंग संस्थेबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – मुंबईत मोठी कारवाई! तीन-चार मजली झोपड्यांवर फिरवला बुलडोझर, वांद्रे स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

सीबीआय तपासात मोटेगावकरांबाबत नेमका काय झाला खुलासा?

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर हे लाखोंचे व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे. ते पेपरफुटीचा व्यवसाय पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवत होते, असं तपासात उघड झालं आहे. आधी काम होऊ द्या मग पैसे द्या असं म्हणत मोटेगावकर लोकांकडून पैसे घेत व्यवहार करत होते. या व्यवहारांमध्ये 30 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा समावेश आढळला आहे. तसेच काही डॉक्टर आणि पालक मोटेगावकरांना कोरा चेक देत होते अशी माहिती समोर आली आहे.

सीबीआय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लातूरमधील आरसीसी इन्स्टिट्यूट सगळ्यात आधी शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यार्थ्यांची निवड करते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. मग पालकांना त्यांच्या मुलांच्या निवडीची हमी दिली जाते. तसेच परीक्षा संपल्यानंतर आणि संस्थेने प्रश्नपेढी वापरल्याची खात्री झाल्यानंतरच पैसे घेतले जात होते. त्यापूर्वी पालक संस्थेला टोकन रक्कम देत होते, अशी धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.

लातूरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या RCC संस्थेत अनेक डॉक्टरांची मुले शिकतात. तसेच आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या पालकांची इच्छा असून त्यासाठी ते कोणतीही रक्कम देण्यास तयार होतात. त्यामुळे आता या संस्थेत आपल्या मुलांसाठी कागदपत्रे विकत घेतलेले अनेक डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts