Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “नेत्यांची भाटगिरी करणे थांबवा…”, खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा अदिती तटकरेंवर हल्लाबोल, राजकीय वाद पेटला
Top News

“नेत्यांची भाटगिरी करणे थांबवा…”, खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा अदिती तटकरेंवर हल्लाबोल, राजकीय वाद पेटला

Sushma Andhare On Aditi Tatkare | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोंदू खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध होते. यामध्ये खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांचा सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे. खरात आणि चाकणकर कुटुंबाचे आर्थिक संबंध असल्याचा दावा सध्या केला जात आहे. यापार्श्वभूमीवर काल प्रतिभा चाकणकरांची तब्बल 18 तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांनी सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी आपला प्रकरणात कसलाही संबंध नसून आपल्याला फसवलं जात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चाकणकरांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यावरही निशाणा साधला.

हेही वाचा – “तुम्ही झोपल्या होता का…”, तृप्ती देसाई रूपाली चाकणकरांवर संतापल्या; म्हणाल्या, खरातला विलन ठरवून…

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत खरात प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रूपाली चाकणकरांसह मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे. चाकणकरांना अटक व्हावी यासाठी आदिती तटकरेंनी आत्तापर्यंत काय प्रयत्न केले? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या की,आदिती तटकरेंनी किती गं बाई मी हुशार हे करणं थांबवलं पाहिजे. त्यांनी नेत्यांची भाटगिरी करणं थांबवलं पाहिजे. त्यांनी चाकणकरांवर अटकेची कारवाई व्हावी यासाठी काय केलं आहे. तटकरेंना नुसती पदं घ्यायची आहेत, त्यांना महिलांची जबाबदारी नाही घ्यायची. मी खरात प्रकरणात पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, चाकणकरांचा फक्त राजीनामाच नाही तर त्यांना अटकही करणं अपेक्षित आहे. तसेच आता खरात आणि चाकणकरांचे आर्थिक संबंध देखील उघड झाले आहेत, असं म्हणत सुषमा अंधारेंनी आदिती तटकरेंवर खोचक टीका केली.

रूपाली चाकणकरांच्या कोणत्या फार्महाऊसवर बुलडोझर चालवला जाईल? याबाबत आदिती तटकरेंनी आत्तापर्यंत काही पत्रव्यवहार केला आहे का? हे सांगणं गरजेचं आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. दरम्यान, सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेवर आदिती तटकरे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांवर काहील कारवाई होणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts