India-Bangladesh Relations : भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यासाठी बांग्लादेशच्या तारिक रहमान सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली. वर्मा यांनी बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. खलीलुर्रहमान यांची भेट घेतली.
भारत- बांगलादेशचे संबंध रूळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. India Bangladesh news 2026 त्या दिशेने भारताने मोठे पाऊल उचलले आहे. ढाक्यातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा (Pranay Verma) यांनी द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यासाठी बांग्लादेशच्या तारिक रहमान सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली. वर्मा यांनी बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. खलीलुर्रहमान( Khalilur Rahman) यांची भेट घेतली. रहमान यांनीही भारतासोबत भागीदारी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
प्रणय वर्मा आणि खलीलुर्रहमान यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी नियमित आणि सकारात्मक संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले. भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी एस. जयशंकर यांच्या वतीने परराष्ट्र मंत्री खलीलुर्रहमान यांना नवी दिल्लीच्या अधिकृत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मात्र, यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. भारताने म्हटले आहे की बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या सोयीप्रमाणे दिल्लीला भेट देऊ शकतात.
हे ही वाचा : फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! स्पेन-अर्जेंटिना महासंग्राम युद्धामुळे रद्द
युनुस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे निर्माण झाला होता तणाव
ऑगस्ट २०२४ नंतर बांग्लादेश आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. युनुस यांनी वारंवार भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि तणाव वाढला.
युनुस यांच्या काळात ढाका-दिल्ली संबंधांमध्ये आलेली कडवटपणा बांग्लादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कमी झाली आहे. मागील महिन्यात तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही देशांमधील तीव्र वक्तव्ये थांबली असून उच्चस्तरीय बैठकींचा क्रम सुरू झाला आहे.
बांग्लादेशच्या डायरेक्टरेट जनरलनेही दिली होती भेट
बांग्लादेशच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्सचे प्रमुख जनरल मोहम्मद कैसर राशिद चौधरी यांनी या महिन्यात दिल्लीला गुप्त भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि इतर वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतली.









