• Home
  • देश
  • भारत–नेदरलँड मैत्रीला ऐतिहासिक वळण; स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर, 17 करारांवर शिक्कामोर्तब
देश

भारत–नेदरलँड मैत्रीला ऐतिहासिक वळण; स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर, 17 करारांवर शिक्कामोर्तब

India Netherlands Relations

India Netherlands Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यात भारत आणि नेदरलँड यांच्यातील संबंधांना नवे बळ मिळाले असून दोन्ही देशांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर करत १७ महत्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केले आहे.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी मिळाली असून दोन्ही आपले संबंध स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी १७ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या करारांमुळे संरक्षण, सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, व्यापार आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे.

आणखी वाचा: 1000 वर्षांनंतर मायदेशी परतला चोलांचा वारसा; 21 तांब्याच्या पट्टिकांचा इतिहास काय आहे?

जागतिक परिस्थितीवर चर्चा

या बैठकीदरम्यान पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. होर्मुज सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) वाहतूक सुरळीत ठेवणे आणि जागतिक ऊर्जा पुरवठा स्थिर राखणे यावर दोन्ही देशांनी भर दिला. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना विरोध करण्याची भूमिका मांडण्यात आली.

आंतरराष्ट्रीय संघर्षांवर मत

रशिया- युक्रेन युद्धावरही दिनही नेत्यांनी चर्चा केली. संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सवांद आणि कूटनीती हा एकमेव मार्ग असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्य

बैठकीनंतर ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप’ जाहीर करण्यात आला. यामध्ये गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्वांटम तंत्रज्ञान आणि डिजिटल इनोव्हेशन यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. ग्रीन हायड्रोजन क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास आराखडाही सुरू करण्यात आला आहे.

युरोपमधील महत्त्वाचा व्यापारी भागीदार

नेदरलँड भारतासाठी युरोपमधील प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. २०२४-२५ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढून अब्जावधी डॉलरपर्यंत पोहोचला आहे. रॉटरडॅम बंदरामुळे नेदरलँड भारतीयनिर्यातदारांची युरोपचा महत्वाचा प्रवेशद्वार मानला जातो.

सेमीकंडक्टर आणि महत्त्वाची खनिजे

दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर उद्योग आणि क्रिटिकल मिनरल्सच्या पुरवठा साखळी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती अपेक्षित आहे.

शिक्षण आणि रोजगाराच्या संधी

मायग्रेशन आणि मोबिलिटी करारामुळे भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना नेदरलँडमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

दहशतवादाविरोधात ठाम भूमिका

दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधात कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली असून ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर सहमती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एकत्र काम करण्यावरही भर देण्यात आला.

पंतप्रधान मोदींचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की मागील दशकात भारत- नेदरलँड संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. दोन्ही देशांमधील समान मूल्ये आणि सहकार्याची भावना भविष्यात अधिक मजबूत भागीदारीसाठी मार्ग मोकळा करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts