• Home
  • देश
  • पर्शियन आखातात अडकली २२ भारतीय जहाजे; इंडियन नेव्हीने शस्त्रसज्ज वॉरशिपची वाढवली संख्या
Top News

पर्शियन आखातात अडकली २२ भारतीय जहाजे; इंडियन नेव्हीने शस्त्रसज्ज वॉरशिपची वाढवली संख्या

faras akhat ship

Iran-Israel-US Conflict : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्शियन आखातात (Persian Gulf)२२ भारतीय जहाजे अडकलेली आहेत. या भारतीय ध्वजधारक टँकरांना ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) मार्गे येण्याची परवानगी आहे आणि ती येतही आहेत. ‘शिवालिक’(shivlik) ‘नंदा देवी’ (nandadevi) आणि ‘जग लाडकी’ (jag ladki) ही तीन जहाजे भारतीय बंदरांवर पोहोचली आहेत. या तिन्ही जहाजांना भारतीय नौदलाने (Indian Navy) सुरक्षितपणे एस्कॉर्ट (Escort )केले आहे.

हे ही वाचा : अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई

जहाजांना एस्कॉर्ट करून सुरक्षित क्षेत्रात पोहचवणार

ओमानच्या आखाताजवळ भारतीय नौदलाचे ‘मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट’ (Mission Based Deployment) अंतर्गत २०१९ पासून एक वॉरशिप कायम तैनात असते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नौदलाने त्यांची संख्या वाढवली आहे. आधी ही संख्या १ वरून ३ करण्यात आली होती. आता या भागात वॉरशिपची संख्या आणखी वाढवण्यात आली आहे, पण ती नेमकी किती आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. या वॉरशिपचे काम भारतीय ध्वजधारक जहाजांना एस्कॉर्ट करून सुरक्षित क्षेत्रात पोहोचवणे आहे.

भारतीय नौदल समुद्री दरोडेखोरीविरोधी मोहिमांसाठी तैनात

‘मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट’ अंतर्गत ओमान आणि अदनच्या आखाताजवळ दोन मोठ्या मोहिमा सुरू आहेत. ओमानच्या आखातात ‘ऑपरेशन संकल्प’ आणि अदनच्या आखातात ‘अँटी-पायरेसी ऑपरेशन’. वेस्ट एशियातील परिस्थितीवर झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल (Randhir Jaiswal)यांनी सांगितले की भारतीय नौदल समुद्री दरोडेखोरीविरोधी मोहिमांसाठी या भागात तैनात आहे. त्यांनी दिलेल्या सहकार्याबाबत अधिक माहिती संरक्षण मंत्रालय देणार आहे.

मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट

२०१७ मध्ये सुरू झालेल्या ‘मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट’ अंतर्गत ओमान आणि अदनच्या आखाताबरोबरच तिसरी तैनाती सेशेल्सजवळ आहे, जी केप ऑफ गुड होप मार्गे ये-जा करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी आणि समुद्री दरोडेखोरी रोखण्यासाठी आहे.चौथी तैनात मालदीवजवळ, पाचवी अंदमान- निकोबारजवळ आणि सहावी तैनाती म्यानमार-बांग्लादेश सीमेच्या जवळ बंगालच्या उपसागरात आहे. या तैनातीदरम्यान भारतीय युद्धनौका मैत्रीपूर्ण देशांच्या नौदलांसोबत सराव करतात आणि कोणत्याही समुद्री दरोडेखोरी किंवा अपघाताच्या वेळी बचाव आणि मदतकार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts