Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • National Film Awards 2026: दिल्लीची परंपरा मोडली! यंदा गुजरातमध्ये रंगणार ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा; जाणून घ्या कारण
देश

National Film Awards 2026: दिल्लीची परंपरा मोडली! यंदा गुजरातमध्ये रंगणार ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा; जाणून घ्या कारण

National Film Awards 2026
23
National Film Awards 2026 हा भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदा ७२वा पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमधील एकता नगर येथे होणार आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

National Film Awards हा भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा दिल्लीबाहेर होणार आहे. यंदा ७२वा National Film Awards सोहळा गुजरातमधील एकता नगर (72nd National Film Awards) येथे रंगणार असून, २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पण पुरस्कार सोहळ्यासाठी गुजरातचीच निवड का करण्यात आली? यामागचं कारण काय आहे, जाणून घेऊया. (National Film Awards latest news)

दिल्लीबाहेर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होण्याची ही पहिलीच वेळ नाही

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards Gujarat) नेहमीच दिल्लीत झाला आहे, असे नाही. यापूर्वीही या परंपरेत बदल करण्यात आले आहेत. १९७१ मध्ये १७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते.

हेही वाचा: आज ८ सप्टेंबरला ‘या’ राशींचे अच्छे दिन! धनलाभासह मिळू शकते मोठी खुशखबर

त्यामुळे गुजरातमध्ये होणार यंदाचा सोहळा हा दिल्लीबाहेर होणारा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नाही. मात्र, अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राजधानीबाहेर होत असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये कोण ठरले मानकरी?

७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची विजेत्यांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार आणि चित्रपटांचा समावेश आहे.

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून निवड झाली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार आहे.

अभिनयाच्या विभागात ममूटी आणि कार्तिक आर्यन यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ममूटी यांना ‘ब्रह्मयुगम’, तर कार्तिक आर्यनला ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरवण्यात येणार आहे.

रणदीप हुड्डालाही राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards winners 2026)

अभिनेता रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित केलेल्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचीही पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या चित्रपटासाठी हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार दिला जाणार आहे. दरम्यान, प्रभास स्टारर तेलुगू चित्रपट ‘कल्कि २८९८ एडी’ ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनप्रधान चित्रपटाचा पुरस्कार मिळणार आहे.

तमिळ अभिनेता धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मच्या श्रेणीत या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

केवडिया आता ‘एकता नगर’ म्हणून ओळखले जाते (Ekta Nagar awards ceremony)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी निवडलेले ठिकाण म्हणजे गुजरातमधील एकता नगर, ज्याला पूर्वी केवडिया म्हणून ओळखले जात होते. हे ठिकाण जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे विशेष प्रसिद्ध आहे.

येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची ५९७ फूट असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये केले होते. त्यामुळे यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा केवळ पुरस्कारांच्या दृष्टीनेच नव्हे, तर त्याच्या ठिकाणामुळेही विशेष ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts