Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पेट्रोल डिझेल कडाडलं! सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, दोन दिवसांत महागाईचा भडका
Top News

पेट्रोल डिझेल कडाडलं! सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, दोन दिवसांत महागाईचा भडका

petrol diesel price hike

petrol diesel price hike : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नागरिकांना ज्या गोष्टीची भीती होती, ती गोष्ट अखेर खरी ठरलीय. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Companies) गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. एप्रिल 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच वाढ (petrol diesel price hike) करण्यात आलीय. त्यानुसार पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतकं महागलंय. या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर 106.54 रुपयांवर पोहोचलाय. तर डिझेल तीन रुपयांनी महागल्यामुळे प्रतिलीटर 93 रुपयांवर जाऊन पोहोचलंय. पेट्रोल आणि डिझेलमधील या दरवाढीमुळे देशभरात महागाईचा भडका (Inflationary Surge) उडण्याची शक्यता आहे.

सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, डिझेल महागल्याने आता मालवाहतूक आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी चिंतेची घंटा, यंदा सरसरीपेक्षा पाऊस कमी होणार, तज्ज्ञांकडून अंदाज

पेट्रोलच्या दरात झालेली वाढ वाहनधारकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईत पेट्रोलने पुन्हा १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे नवे दर प्रति लिटर प्रमाणे. मुंबई शहरात १०६.६८ रुपये (३.१४ रुपयांची वाढ), दिल्ली ९७.७७ रुपये (३.०० रुपयांची वाढ), कोलकाता १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ), चेन्नई १०३.६७ रुपये (२.८३ रुपयांची वाढ) झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार यांचा परिणाम भारतीय इंधन दरांवर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या दरांमध्ये अचानक ३ रुपयांची वाढ झाल्याने सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी प्रवासासाठी आता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतील.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिले तेल आणि गॅस वाढीचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तेल आणि गॅसच्या दरात वाढ होण्याचे संकेत दिले होते. पुरी आणि गव्हर्नर यांनी स्पष्ट केलं होतं की, तेल कंपन्यांवर दबाव वाढत असल्यानं दरवाढ जास्त काळ रोखता येणार नाही. यानंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची तर सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आलीय.

मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे; ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष उफाळून आला असूनही, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ करणे दीर्घकाळापर्यंत टाळले होते; तथापि, तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अखेर इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना

गेल्या रविवारी, सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 95 च्या पातळीच्या खाली घसरले आहे.

पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ

देशात महागाईचा दबाव आता अत्यंत वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे. या महागाईच्या वाढीमध्ये ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. मार्चमध्ये केवळ 1.05 टक्क्यांवर असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर झेपावली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts