Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • भारताने करून दाखवलं! अमेरिकने लावलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कमी होणार
Top News

भारताने करून दाखवलं! अमेरिकने लावलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कमी होणार

The tariff will be reduced by 25 percent

The tariff will be reduced by 25 percent  : भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. फक्त टॅरिफच नाही तर अनेक निर्बंधही लादली आहेत. कोणत्याही भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता अमेरिकेचा दबाव भारतावर राहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धमक्यांनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही. यामुळे भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. मात्र, आता भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केले. त्यामुळे भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कमी करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दिलीय.

हेही वाचा – ‘जर त्यांनी लोकांना फाशी दिली तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करु…’; अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकावलं

भारताने आपल्या देशाची ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी इतर पर्याय निवडले आहेत. इतर देशांकडून तेल खरेदी भारताकडून केली जात आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होती. मात्र, काही मार्ग निघू शकला नाही. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय मार्केट हवे आहे. मात्र, यातून भारतीय शेतकऱ्यांच नुकसान होण्याची शक्यता असल्याने भारताकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीन

भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी कमी केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया युक्रेन युद्ध सुरू असल्याचाही गंभीर आरोप अमेरिकेने भारतावर केला. मात्र, रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. ज्यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुढे आली. चीन अजूनही रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, भारताने तेल खरेदी बंद केली.

25 टक्के अतिरिक्त टॅरिफ कमी केला जाऊ शकतो

स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट म्हटले की, ज्या उद्देशासाठी भारतावर टॅरिफ लावला होता, तो आता पूर्ण झाला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावला होता. आता तो उद्देश पूर्ण झाला. हे मोठे यश आहे. आमच्या या पावलाने भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली. त्यामध्ये 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ कमी केला जाऊ शकतो. टॅरिफ सध्या आहे पण भारतावरील टॅरिफ कमी करण्यासाठी महत्वाचा मार्ग मिळाला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts