Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • Bihar Election : यापेक्षा वेगळा निकाल शक्य नाही, एकदम महाराष्ट्र पॅटर्न; बिहार निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Top News

Bihar Election : यापेक्षा वेगळा निकाल शक्य नाही, एकदम महाराष्ट्र पॅटर्न; बिहार निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

website 65
125

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!. एकदम महाराष्ट्र पॅटर्न!. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा – Bihar Election : बिहार निवडणुकीत एनडीए ‘छप्पर फाड’ बहुमत तर महागठबंधन ला जनतेने दाखवला बाजार

भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर खोचक टीका

सध्या संजय राऊत आजारी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती जास्त ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे. पण सध्या आजारी असल्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा बंद आहेत. दोन महिने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राऊत सध्या कॅमेऱ्यापासून लांब आहेत. दोन महिन्यांनी मी पुन्हा ठणठणीत होऊन येईन असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र, आज बिहार निवडणुकीचे हाती आलेले निकाल पाहून त्यांना स्वत:वर आवर घालता आला नाही. त्यांनी आपल्या एक्स या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर खोचक टीका केली आहे.

बिहारमध्ये चित्र काय?

मागच्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला आहे. महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांवर क्लिन बोल्ड झाली आहे. त्यावेळी भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेलला. भाजपने 125 पेक्षा जास्ता जागा जिंकलेल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि त्याखालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता.

आता बिहारच चित्र सुद्धा असच आहे. भाजपप्रणीत एनडीए 195 आणि काँग्रेस प्रणीत महाआघाडीला फक्त 38 जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे 90, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 81, एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर आघाडीवर आहे. तेच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 28, काँग्रेसला 5 आणि डावे 4 जागांवर आघाडीवर आहेत.

‘एनडीए’ला रेकाॅर्ड ब्रेक जागा

मागील निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ला १२५ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र रेकाॅर्ड ब्रेक 198 जागा मिळाल्या आहेत. तर मागील निवडणुकीत 110 मिळालेल्या महागठबंधन आघाडीच्या पदरात यंदा केवळ 45 जागा पडल्या आहेत. एनडीए चे पक्षनिहाय बलाबल पाहिले तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. 101 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या खात्यात तब्बल 86 आल्या आहेत. मागील निवडणुकीत ती संख्या 74 होती म्हणजे भाजपला 14 जागा अधिकच्या मिळाल्या आहेत. तर नितिशकुमार यांच्या जेडीयू ला 78 जागा मिळाल्या आहेत, ज्या मागील निवडणुकीत केवळ 43 होत्या. म्हणजे जेडीयू ला देखील 35 जागा अधिकच्या मिळाल्या आहेत. तर 29 जागांवर निवडणुक लढणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 21 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा केवळ १ आमदार होता.

दुसऱ्या बाजूला मागील निवडणूकीत 75 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेजस्वी यादव यांच्या आरजेडी ला यंदा मात्र केवळ 32 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे एकूणच आकड्यांचे गणित मांडले तर या निवडणुकीत आरजेडीचे तब्बल 43 जागांचे नुकसान झाले आहे. तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस मागील निवडणुकीत १९ जागा होत्या. यंदा मात्र त्यांना एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या वाटेल यंदा केवळ ४ जागा आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts