Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • Bihar Election : बिहार निवडणुकीत एनडीए ‘छप्पर फाड’ बहुमत तर महागठबंधन ला जनतेने दाखवला बाजार
Top News

Bihar Election : बिहार निवडणुकीत एनडीए ‘छप्पर फाड’ बहुमत तर महागठबंधन ला जनतेने दाखवला बाजार

Bihar Election : बिहार विधानसभेतील 243 जागांसाठी एकूण 2 हजार 661 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणूकीचे निकाल आता हाती आले आहेत. एक्झिट पोलमध्ये बिहारची जनता कोणाच्या हातात सत्ता देणार याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, हे निकाल प्रत्यक्षात कसे असणार हे पाहण्यासाठी प्रत्येक देशवासी इच्छुक होता. आता त्याचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार, 160 जागा जिंकणार असलेल्या एनडीए ने प्रत्यक्षात मात्र छप्पर फाड असे बहुमत दिले आहे. बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र 190 पार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बिहारच्या जनतेने एनडीए छप्पर फाड आणि महागठबंधन यांना बाजार दाखवल्याचे दिसून येत आहे.

मागील निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ला १२५ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र रेकाॅर्ड ब्रेक 198 जागा मिळाल्या आहेत. तर मागील निवडणुकीत 110 मिळालेल्या महागठबंधन आघाडीच्या पदरात यंदा केवळ 45 जागा पडल्या आहेत. एनडीए चे पक्षनिहाय बलाबल पाहिले तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. 101 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या खात्यात तब्बल 86 आल्या आहेत. मागील निवडणुकीत ती संख्या 74 होती म्हणजे भाजपला 14 जागा अधिकच्या मिळाल्या आहेत. तर नितिशकुमार यांच्या जेडीयू ला 78 जागा मिळाल्या आहेत, ज्या मागील निवडणुकीत केवळ 43 होत्या. म्हणजे जेडीयू ला देखील 35 जागा अधिकच्या मिळाल्या आहेत. तर 29 जागांवर निवडणुक लढणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 21 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा केवळ १ आमदार होता.

दुसऱ्या बाजूला मागील निवडणूकीत 75 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेजस्वी यादव यांच्या आरजेडी ला यंदा मात्र केवळ 32 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे एकूणच आकड्यांचे गणित मांडले तर या निवडणुकीत आरजेडीचे तब्बल 43 जागांचे नुकसान झाले आहे. तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस मागील निवडणुकीत १९ जागा होत्या. यंदा मात्र त्यांना एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या वाटेल यंदा केवळ ४ जागा आल्या आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात गृहमंत्री अमित शहा यांनी “अबकी बार 160 पार” ही घोषणा दिली होती. त्यांचा हा नारा खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या मते, एनडीए 198 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजप 88, जेडीयू 79, एलजेपी 21 आणि एचएएम 4 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 38 जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 32 जागांवर आघाडी घेतली आहे आणि चिराग पासवान यांचा एलजेपीआर २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल प्रत्येकी सहा जागांवर आघाडीवर आहेत.

हेही वाचा – बिहार कोणाचं? बिहार विधानसभेचे निकाल लाइव्ह …

भाजप- एनडीए चे निवडणुकीतील मुद्दे आणि ते कसे चालले..

नितीश कुमारांचा सुशासन फॅक्टर – महिलांना मोफत बस प्रवास, पंचायतींमध्ये ५०% आरक्षण, दारूबंदी, गुन्हेगारी कमी, रस्ते-वीज-पाणी योजनांमुळे महिला आणि युवा मतदार मोठ्या संख्येने NDA कडे वळले. या निवडणुकीत नितीशांना विकास पुरुष म्हणून क्रेडिट मिळाले.

मोदींच तगडा प्रचार आणि राष्ट्रीय इमेज – मोदींनी 20 हून अधिक सभा घेतल्या. डबल इंजिन सरकार, केंद्राच्या योजनांचा (आवास, उज्ज्वला, आयुष्मान भारत) फायदा, जंगलराज परत येईल असे RJD वर हल्ला करण्यात आले. मोदींची लोकप्रियता + नितीशांचा स्थानिक चेहरा = परफेक्ट कॉम्बिनेशन यामुळे त्याचे मतांमध्ये रूपांतर झाले.

महिला मतदारांचा मोठा पाठिंबा: बिहारमध्ये महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्याचे प्रमाण जवळपास (67 टक्के) एवढे आहे. NDA च्या महिला कल्याण योजना, (जसे मुख्यमंत्री रोजगार योजना, पोलिस भरतीत 33%आरक्षण, शिक्षिका भरती) यामुळे महिला मतदार NDA कडे झुकला. त्याचा थेट परिणाम निकालावर झाला.

जंगलराजची भीती – भाजपने लालू यादव आणि राबडी देवी यांच्या काळातील गुन्हेगारीवर बोट ठेवलं, अपहरण प्रकरणांची आठवण करून दिली. लोकांना स्थिरता हवी होती त्यामुळे हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चालला.

महाआघाडीचे कोणते मुद्दे होते आणि ते का चालले नाहीत ?

राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप लोकांना पटला नाही. त्यांच्याकडून केवळ आरोप करण्यात आले मात्र, त्याचे प्रात्यक्षित त्यांना दाखवता आहे नाही.

बेरोजगारी आणि 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन – 2020 मध्ये हे आश्वासन खूप चालले होते, मात्र यंदा तेजस्वी यादव यांचे “एक कुटुंब-एक नोकरी” आश्वासन अवास्तविक वाटले. त्यापेक्षा त्यांना एनडीए च्या 20 वर्षांच्या सत्तेत काही सुधारणा झाल्या झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये महिला सक्षमीकरण, रस्ते, वीज, पाणी, यांसारख्या मुद्दे चालले.

जातनिहाय जनगणना आणि आरक्षण वाढ – बिहार सरकारने आधीच जात जनगणना केली होती आणि NDA ने त्याचा फायदा घेतला. केंद्रातही जात जनगणना होईल असे मोदींनी सांगितले, त्यामुळे हा मुद्दा “विशेष” राहिला नाही. त्यामुळे EBC/OBC मतदार NDA कडे वळाला.

अग्निवीर योजना आणि युवा असंतोष – राहुल गांधी यांनी अग्निवीरवर टीका केली, पण मोदींच्या प्रचारात “राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्यात बिहारी युवकांना संधी” असे सांगितले गेले. त्यामुळे युवा मतदारांचा काही भाग NDA कडे गेला. त्यामुळे हा मुद्दा सफसेल फेल ठरला.

स्थलांतर – दोन्ही बाजूंनी हा मुद्दा उचलला, पण NDA ने “गेल्या जंगलराजात शिक्षण-रोजगार नव्हते, आता सुधार झाला” असे सांगितले.

महाआघाडीमध्ये अंतर्गत मतभेद – RJD-काँग्रेस-डावे यांच्यात समन्वय कमी होता, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत गोंधळ झाला त्यामुळे या निवडणुकीत महाआघाडीला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts