Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपाचे चौधरी बिहारचे नवे ‘सम्राट’; मुख्यमंत्रीपदासाठी निवड होताच काय म्हणाले?
ताज्या बातम्या

भाजपाचे चौधरी बिहारचे नवे ‘सम्राट’; मुख्यमंत्रीपदासाठी निवड होताच काय म्हणाले?

भाजपाचे चौधरी बिहारचे नवे 'सम्राट'; मुख्यमंत्रीपदासाठी निवड होताच काय म्हणाले?

पाटणा Samrat Chaudhary : बिहारच्या राजकारणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपा नेते सम्राट चौधरी (samrat chaudhary) हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. यासह पहिल्यांदाचल बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री (new chief minister of bihar) होणार आहे.

हेही वाचा : बिहारमध्ये नितीश युगाचा अंत! नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, पोस्ट करत

नितीश कुमारांनी दिला राजीनामा :

यापूर्वी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री म्हणून आपल्या अखेरच्या संदेशात नितीश कुमार म्हणाले होते, “मी आता पद सोडत आहे, पण नव्या सरकारला माझं मार्गदर्शन मिळत राहील.” विशेष म्हणजे, सम्राट चौधरी हे बिहारमधील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होणार आहेत. याच संदर्भात, विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचं पहिलं वक्तव्यही समोर आले आहे.

सम्राट चौधरी काय म्हणाले? :

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या निवेदनात सम्राट चौधरी म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि भाजपा बिहार विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानतो. माझ्यासाठी हे केवळ एक पद नाही, तर बिहारच्या जनतेचा विश्वास आणि स्वप्ने पूर्ण करण्याची ही एक पवित्र संधी आहे. मी पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणानं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची शपथ घेतो. आपले तेजस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि आपले माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली, मी बिहारला विकास, सुशासन आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करत राहीन. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे. जय बिहार, जय भारत!”

नितीश यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा :

बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी लोक भवन इथं राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला असून, यासोबतच बिहारमधील “नितीश युगाचा” अंत झाला आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts