• Home
  • राजकारण
  • ” प्रिय उदयभाऊ उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला आम्हालाही बोलवा;” सुषमा अंधारे
Top News

” प्रिय उदयभाऊ उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला आम्हालाही बोलवा;” सुषमा अंधारे

Sushma Andhare Uday Samant

“शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या.” असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती, असंही सामंत यांनी म्हटलं होतं. याला आता सुषमा अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांची महत्वाकांक्षा आता झाकून राहिली नाही. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यामुळे प्रिय उदयभाऊ उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का? अशा कानपिचक्या अंधारे यांनी मारल्या आहेत. तसेच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचा धमकी पॅटर्न! “मत कमी पडली तर खैर नाही”; मंत्री हसन मुश्रीफांची मतदारांना धमकी..

सुषमा अंधारे यांचे फेसबुक पत्र, प्रिय उदयभाऊ..

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले… त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केलं.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले. उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात.

होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली

होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली. दिल्ली महाराष्ट्र सदन च्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते.

उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला

उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं. असो हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे. ताजकलम… तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बर का? असा उपरोधित टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts