• Home
  • राजकारण
  • शिवस्मारक अनावरण प्रकरण! गुन्हाची नोटीस घेयला अमित ठाकरे थेट ठाण्यात, मनसैनिकांची तोबा गर्दी
Top News

शिवस्मारक अनावरण प्रकरण! गुन्हाची नोटीस घेयला अमित ठाकरे थेट ठाण्यात, मनसैनिकांची तोबा गर्दी

Amit Thackaray

नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगी शिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आज अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला जाऊन नोटीस स्विकारली आहे. याच्याआधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्प हार अर्पण केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिस नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर तोबा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

पोलीस ठाण्यासमोर मनसैनिकांची तोबा गर्दी

“हे यश महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं आहे. त्यांच्या ताकदीमुळे आपण हे कार्य करू शकलो. राजकारणात यायच्या अगोदरपासून मी राज ठाकरे यांना बघत आलो. त्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनेक केसेस झेलल्या. मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी मनसैनिक लढत आहेत. त्यामुळे ही पहिली केस अंगावर घेण्याचा आत्मविश्वास या सर्वांमुळे मला मिळाला आहे. त्यामुळे तुमचे सर्वात अगोदर धन्यवाद मानतो. गेल्या रविवारपासून ही गोष्ट सुरू आहे. या आठवड्यात मी इतकंच शिकलोय की समोरच्याने आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांचे आणि देवांचे आशीर्वाद असले की समोरचे झुकतात.” असा छोटेखानी पण जबरदस्त संदेश अमित ठाकरे यांनी नेरुळमधील सभेतून शिवप्रेमींना दिला.

हेही वाचा – संजय राऊतांच्या ट्विटने राजकारणात खळबळ! मनसेमुळे महाविकास आघाडीत उलथापालथ होणार?

नोटीस स्वीकारण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाण्याची घोषणा

गेल्या आठवड्यात अमित ठाकरे हे नेरुळमध्ये असताना त्यांना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रखडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने तिथे जात या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. ही नोटीस घेण्यासाठी ते घरी नव्हते. त्यानंतर ही नोटीस स्वीकारण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज ते नेरुळमध्ये दाखल झाले. त्यांनी स्वत: ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली.

अमित ठाकरे यांनी आल्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन केले

अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्यावरील कपडा सुद्धा खराब झाल्याचा आरोप केला आणि पुतळ्याचे अनावरण केल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. ती स्वीकारण्यासाठी ते आज नेरुळ येथे दाखल झाले. सकाळपासून त्यांचा ताफा, ते नेरुळमध्ये येऊन काय बोलणार याची उत्सुक्ता मनसैनिकांमध्ये होती. मनसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. अमित ठाकरे यांनी आल्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आणि नंतर त्यांनी मनसैनिकांशी हितगूज साधले.

अमितजी ठाकरेंवर गुन्हा,आपला अभिमान नाही तर गर्व आहे

गेली ६ महिने नवी मुंबईतील शिवछत्रपतींचे धूळखात ठेवलेले बंदिस्त स्मारक खुले केले म्हणून अमितजी ठाकरेंवर दळभद्री सरकार कडून गुन्हा दाखल.मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबुतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप कोणतीही कारवाई नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठले स्वराज्य ? शिवप्रेमी आणि शिवभक्त मराठी माणसा ऐका, वाचा, आणि पेटून उठा, असे आवाहन मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts