Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेते रितेश देशमुख करणार बिगबॉस मराठी सिझन 6 चे सूत्रसंचालन; बिगबॉस हिंदीच्या मंचावर भाईजानने केली घोषणा
मनोरंजन

अभिनेते रितेश देशमुख करणार बिगबॉस मराठी सिझन 6 चे सूत्रसंचालन; बिगबॉस हिंदीच्या मंचावर भाईजानने केली घोषणा

Riteish Deshmukh on stage as the new host of Bigg Boss Marathi Season 6, announcement made on Bigg Boss Hindi platform with Salman Khan.

Riteish Deshmukh Bigg Boss Marathi 6 : लवकरच बिग बॉस मराठी सीझन 6 चे टीजर लॉन्च करण्यात आले असून आता हा सीझन होस्ट कोण करणार यावर चर्चा रंगली आहे. या फॅमिली शो ने सर्वाना वेड लावलंय. सर्वजण या सीजनची वाट पाहत असून सर्वांच्या लाडक्या भाईजान सलमान खानाने हिंदी बिगबॉसच्या सेटवर मराठी सीझनच्या होस्ट बद्दल माहिती दिली आहे.

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सिझन 6 सुरु होणार आहे. त्यापूर्वी या सीझनचे टीजर रिलीज करण्यात आले असून या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या शो चे सूत्रसंचाल करणार तरी कोण ? असा सवाल सर्वत्र विचारला जात असून याबाबतच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या बिगबॉस हिंदी मध्ये अभिनेता सलमान खान यांनी बिगबॉस मराठी सिझन 6 चे सूत्रसंचालनथा होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याची माहिती दिली.

सलमान खानने केले रितेश देशमुखचे स्वागत

भाईजान, अभिनेता सलमान खानने या वर्षाची सर्वात मोठी घोषणा करत रितेश देशमुख यांचे बिग बॉस हिंदीच्या मंचावर स्वागत केले. आणि सर्वांसमोर बिगबॉस मराठीच्या नवीन सिझनचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्याचे सांगितले. अशा पद्धतीने रितेश देशमुख यांचे स्वागत होणे आणि ही घोषणा प्रेक्षकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला

बिगबॉस हिंदी संपल्यानंतर एंटरटेंमेन्ट सुरु असणार आहे. कारण लवकरच बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि तो घेऊन येणार आहे माझा भाऊ रितेश देशमुख. भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, ‘बिग बॉस हिंदी’ संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी तू घेतली आहे. असे अभिनेता सलमान खानने बिग बॉस हिंदीच्या मंचावर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आगामी सिझनसाठी शुभेच्छा

बिगबॉस हिंदीच्या मंचावर सलमान खानने रितेश देशमुखचे दबंग स्टाईल मध्ये स्वागत केले. सलमान खानने बिगबॉस सिझन 5 चे कौतुक केले. आणि आगामी सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. या बिगबॉस मध्ये रितेश देशमुख यांनी सदस्यांसोबत संवाद साधत एका सदस्याचे एलिमेनेशन देखील केले आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 प्रेक्षकांना कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टार वर देखील पाहता येणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts