Akshaye Khanna dance video viral : नुकताच रणवीर सिंहचा धुरंधर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाने आकर्षक कमाई केली. त्यानंतर विकेंडला चित्रपटाची कमाई आणखी वाढेल अशी अशा होती. परंतु हवी तेवढी कमाई झाली नसली तरीही आणखी काही दिवसात चित्रपट चांगली कमाई करेल अशी अशा आहे. या चित्रपटातील रेहमान डकैती नामक व्यक्तीची भूमिका साकारणारे अक्षय खन्ना सध्या चांगलेच चर्चेत आहे.
धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाचा लूक, अभिनय, डान्स, थंड नजर सर्वकाही खिळवून ठेवणारे होते. रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षयवर एक अप्रतिम असे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याची आणि अक्षय खन्ना यांनी केलेल्या डान्स ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आणि या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : बिगबॉस 19 ची ट्रॉफी जिंकणारा गौरव खन्ना आहे तरी कोण? जाणून घ्या जिंकलेली किती रक्कम घरी घेऊन जाणार
या डान्स व्हिडीओ शूट करण्याबाबत अक्षय खन्ना यांनी धुरंधरचे दिग्दर्शक यांना एक्सट्रा कहाणी करू शकतो का असे विचारले होते. त्यानंतर होकार मिळाल्यानंतर अक्षय खन्ना ने स्वतः हा डान्स बसवून हे गाणे शूट केले होते. परंतु या गाण्याच्या शूटिंग दरम्यान अक्षय ची तब्येत अत्यंत बिघडली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये तो ‘शेर-ए-बलोच’ स्टाइलमध्ये अरबी स्टेप्स करताना दिसत आहे.
शुटिंगवेळी बिघडली तब्येत
धुरंधर चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या लोकेशनवर करण्यात आल्याने त्याला तेथिल वातावरण सूट झाले नाही. त्यामुळे अक्षय खन्ना सर्वत्र ऑक्सिजन मास्क लावूनच काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान बालुच येथे लोकांना जाऊन भेटतानाचा आणि डान्स करतानाचा व्हिडीओ अशाच पद्धतीने शूट करण्यात आला. या गाण्याचे नाव FA9LA हे आहे. या गाण्यातील अक्षय खन्ना यांची एंट्री प्रचंड मन मोहून घेते.
Sher a Baloch song in #Dhurandhar : Potrayal of Independence of Balochistan .
The Dancers wearning traditional Balochi Dress . It shows how Balochistan is different from Pakistan . Pakistan is hating this movie because it talks about Free Balochistan . pic.twitter.com/TMoAGXmgpm— Shahaan Baluch (@Shahaanbaloch95) December 8, 2025
कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी एक किसा शेअर केला. ते म्हणाले की, लडाखमध्ये दिग्दर्शक आदित्य धर यांनी बलुचिस्तानचा एक सेटअप तयार केला होता. परंतु तिथे हाय-अल्टीट्युड सिकनेस प्रचंड असल्याने जे लोक इथे फिरायला किंवा शूटिंग करायला येतात, तेव्हा त्यांना पहिल्या दिवशी फक्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो. अक्षय खन्ना देखील इथे पोहोचले, परंतु त्यालाही इथे प्रचंड त्रास झाला. त्यामुळे त्याला याठिकाणी शूटिंगदरम्यान ऑक्सीजन मास्क आणि ऑक्सीजन सिलेंजर लावूनच फिरावं लागलं.
सोशल मीडियावर व्हायरल
या व्हायरल गाण्यातील अक्षय खन्नाचा डान्स कोरीओग्राफरने नाही तर स्वतः त्यांनी बसवला होता. या गाण्याच्या सिन मध्ये त्याला एंट्री करून आत यायचे होते. तेव्हा त्याने तेथील डान्सर्सचा परफॉर्मन्स बघून स्वतःची डान्स स्टेप बसवली. आणि डान्स शूट पूर्ण केले. आणि हाच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.












