Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट! कराडसह सर्व आरोपींना कोर्टाचा धक्का
गुन्हा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट! कराडसह सर्व आरोपींना कोर्टाचा धक्का

Santosh Deshmukh murder case update

Santosh Deshmukh murder case update : बीडच्या मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने सर्वांनी शोक व्यक्त केला होता. आरोपींनी हत्येचे काही फोटो व्हायरल वाल्किक कराडला याबाबतची माहिती दिली होती. मात्र, आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालय परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अॅड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित यावेळी होते. सुनावणीनंतर बोलताना अॅड. उज्वल निकम यांनी म्हटले की, अखेर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे हा वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींसाठी धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा; संजय राऊत

संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी आजूनही फरार असून इतर सर्व आरोपी जेलमध्ये आहेत. संतोष देशमुखच्या हत्येनंतर राज्यभर जनआक्रोश मोर्चे काढण्यात आली. यादरम्यान बीडमधील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना दिसली. बीडमधील परिस्थिती तणावात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्याने थेट धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आली.

न्यायालयाने आज आरोप निश्चित केले – अॅड. उज्वल निकम

सर्व आरोपींना VC द्वारे हजर करण्यात आले होते. आरोपींचे वकील यावेळी उपस्थित होते. सुनावणी दरम्यान आरोपींवरील ड्राफ्ट कोर्टाने वाचून दाखवला. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं म्हटलं आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. सुनावणीनंतर बोलताना अॅड. उज्वल निकम यांनी म्हटले की, अखेर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. आजही आरोपीच्या वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फॉर डीरेल केले गेले. खटल्यात विलंब लावणे व खटला उलथवून टाकण्याचा प्रयत्न आहे.

प्रकरण कोणत्याही कोर्टात असो लवकर निकाली काढण्यासाठीचा प्रयत्न

प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच ती कारणे न्यायालयात मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिले. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो किंवा कोणत्याही कोर्टात असो प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे अॅड. उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts