Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! २६ तारखेला अजित पवार अधिकृत घोषणा करणार..
Top News

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! २६ तारखेला अजित पवार अधिकृत घोषणा करणार..

Sharad Pawar Ajit Pawar together

NCP reunification announcement : दोन दिवसांपूर्वी हाती आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्ष महापालिकांच्या रणनीतीसाठी आखत आहेत. मुंबई महापालिका आपल्या हाती ठेवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार असून त्याबाबतची उद्या अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होत. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २६ डिसेंबर रोजी दोन्ही पवार एकत्र येण्याची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा; संजय राऊत

मुंबई महानगरपालिकेसह अन्य काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांनी मनसे एकत्र येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता अधिकृतपणे दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येत शिवसेना-मनसे युतीची घोषणा करणार आहेत. त्यानंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं. तसचं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सर्व गोष्टी समोर येतील. कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. या संदर्भात अजित पवार उद्या मुंबईत आढावा घेणार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू

प्रशांत जगताप यांच्या इशार्‍यानंतर देखील पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची एक गुप्त बैठक सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे. आजच्या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनामा

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. यावरूनच प्रशांत जगताप हे नाराज असून त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबईला भेटीसाठी बोलावल्याचं सांगितलं जात असून पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजीनाम्याच्या चर्चावर प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली असून आज संध्याकाळपर्यंत माझा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts