Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • 2025 ने दिले हे टॉप 5 मराठी चित्रपट; जे ठरलेत बॉक्स ऑफिसवर हिट
मनोरंजन

2025 ने दिले हे टॉप 5 मराठी चित्रपट; जे ठरलेत बॉक्स ऑफिसवर हिट

Collage of top Marathi movies that became box office hits in 2025

Top Marathi movies 2025 : 2025 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास आणि महत्वपूर्ण ठरले, नाही का ? कारण दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय भव्य सादरीकरण या सर्वांचा विचार केला तर चाहत्यांना अनेक चांगल्या मराठी चित्रपटांची मेजवानी मिळाली. ज्याचे कथानक मनाला भोवळ घालेल अशी होती. तर अनेक नवीन कलाकारांनी देखील 2025 हे वर्ष गाजवलं. आणि प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. मराठी चित्रपटांची ओळख जबरदस्त अभिनय आणि जिवंतपण दर्शवणाऱ्या कथांनी त्यांची ओळख अधिकच ठळक केली. पाहुयात या सरत्या वर्षात आपल्याला कोणते खास मराठी चित्रपट मिळाले.

1 दशावतार

2025 यावर्षात अनेक लो बजेट चित्रपटांनी धूम ठोकली. यावर्षीचा मराठी बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे दशावतार. दशावतार चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेने जुन्या चित्रपटप्रेमींचेच नाही तर gen z चे देखील लक्ष वेधून घेतले. दशावतार हा चित्रपट 2025 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या स्पेंस थिलर सिनेमाने चाहत्यांना भुरळ घातली. कोकणातील पारंपरिक दशावतार कला, निसर्ग संवर्धन यावर भाष्य करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 28 कोटी रुपयांची कमाई केली.

2. जारण

जारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दुसरे स्थान पटकावले. या चित्रपटातील अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला. हा चित्रपट ऋषिकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दुर्गम भागात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय कौतुकास्पद आहे. या चित्रपटाने 9 ते 10 कोटींच्या घरात कमाई केली आहे.

3. सुशीला सुजित

सुशीला सुजीत या चित्रपटात हलकी फुलकी रोमॅंटिक कॉमेडी दर्शवली आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून लिखाण देखील त्यांनी केले आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली. या चित्रपटाची कथा अनपेक्षित परिस्थिती भोवती फिरते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 8 कोटींच्या घरात कमाई केली होती. चित्रपटातील स्वप्नील जोशीकहा अभिनय प्रेक्षकांना भोवळ घालतो.

हे ही वाचा : बॅटल ऑफ गलवान टिझरला ट्रोल करणाऱ्यांना तहेसिन पुनावाला यांनी दिले प्रत्युत्तर

4. गुलकंद

गुलकंद या मराठी चित्रपटाने त्याच्या नावाने आणि चित्रपटात असलेल्या स्टारकास्ट ने सोशल मिडियावर चांगलीच हवा केली होती. या चित्रपटात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे यांच्या भूमिका होत्या. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. आणि हाच धुमाकूळ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील कायम राहीला. हा चित्रपट सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शित केला आहे.

5 आता थांबायच नाय

आता थांबायचं नाय या चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची जोडी बघायला मिळाली. हि जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीची राहिली आहे. या जोडीने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवले आहे. हा चित्रपट सफाई कामगारांचं आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 7.45 कोटींची कमाई केली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts