Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या, पंख्याला गळफास घेऊन संपवले जीवन
गुन्हा

सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या, पंख्याला गळफास घेऊन संपवले जीवन

Sinhgad College student suicide

Sinhgad College student suicide : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या कोर्टी येथील सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वसतीगृहातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. खोलीच्या दरवाजाला कडी लावुन दोन टॉवेलची गाठ मारुन छताच्या पंख्याला लटकून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. केदार धनंजय घाडगे (वय १९, रा. ईडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हेही वाचा – काळीज पिळवटून टाकणारी घटना! ८ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीने लष्कारातील बापाचे घेतले अंतिम दर्शन

पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, केदार धनंजय घाडगे हा पंढरपूर तालूक्यातील कार्टी येथील सिंहगड कॉलेज येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षणास होता. तसेच तो सिंहगड कॉलेज हॉस्टेल येथेच कॅम्पसमध्ये राहण्यास होता. केदारने होस्टेलच्या रुमच्या दरवाज्याला आतून कडी लावली होती. आणि दोन टॉवेलची गाठ मारुन त्याने रुममधील सिलिंग फॅनला गळफास घेतला आहे.

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे दाखल करण्यात आलं होतं 

त्याच्या मित्रांनी रुमचा दरवाजा तोडुन त्याला औषधोपचारास उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे घेऊन गेलो. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पाहीले आणि त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. याबाबत केदारच्या मामा सिद्धेश्वर हनुमंत काकडे (वय ३३, रा. ढगपिंपरी, ता-परांडा जि. धाराशिव) यांनी पोलीस ठाण्यात माहीती कळविली आहे.

त्याला १० आणि १२ वीच्या परिक्षेत उत्तम मार्क

संबंधीत विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे मृत्यचे कारण स्पष्ट झाले नाही. केदार खूप हुशार होता. त्याला १० आणि १२ वीच्या परिक्षेत उत्तम मार्क पडले होते. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजले नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts