Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या मतदान प्रक्रियेत सुमारे 57.71 टक्के मतदानाची नोंद
Pune

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या मतदान प्रक्रियेत सुमारे 57.71 टक्के मतदानाची नोंद

Pimpri Chinchwad Election Voting Percentage

Pimpri Chinchwad Election Voting Percentage : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदार यांच्यासह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी 57.71 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी

8 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.56 टक्के मतदान झाले. तर सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते 16.3 टक्के इतके झाले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण 2815 टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 40.5 टक्के मतदान पार पडले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सरासरी 57.71 टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते. तर पुण्यात संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचाशाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

प्रभागनिहाय मतदान टक्केवारी –

प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के

प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के

प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के

प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के

प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के

प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के

प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के

प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के

प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के

प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के

प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के

प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के

प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के

प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के

प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के

प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के

प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के

प्रभाग क्र. १८ – ५६.१८ टक्के

प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के

प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के

प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के

प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के

प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के

प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के

प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के

प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के

प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के

प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के

प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के

प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के

प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के

प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के

कंट्रोल रुमद्वारे लक्ष

मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन येथे कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू राय आणि निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली.

मतदारांसाठी विविध सोयीसुविधा

मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या त्या मध्ये मतदारांचे मोबाईल जमा करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. यामुळे केंद्रावर मोबाईल घेऊन आलेल्या मतदारांना सुरक्षित मोबाईल जमा करून मतदान करता आले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका, महाविद्यालयातील स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व सुविधांमुळे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्व मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुरळीतरीत्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts